BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ फेब्रु, २०२३

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुत्राकडून खासदार संजय राऊत यांच्या हत्येची सुपारी - संजय राऊत यांचा आरोप !

 


 नरक 'वास' !

✪🅾 दुर्गंधीचा सहावा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी उपनगरात दुर्गंधीचे साम्राज्य कायम! उघडी गटार तुंबलेलची, डुकरांचा धिंगाण.. आरोग्याचा पंचनामाा... कुणाला ना देणे ना घेणे ! ✪




शोध न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला असून तसे पत्र त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना दिले आहे.

राज्याच्या राजकारणातील प्रदूषण आता भलतेच वाढू लागले असल्याचे दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच 'आपला घातपात घडविण्याचे कारस्थान सुरु आहे' अशी तक्रार थेट पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून केली आहे. राज्यातील एकूण वातावरण हे प्रचंड दुषित झाले असल्याचे दिसत असून सत्तेच्या भोवती राजकारण फिरत असून राज्यातील अन्य समस्या या दुय्यम झालेल्या आहेत. सत्तासंघर्षात गेले काही महिने गेले असून अजूनही सर्वोच्च न्यायालयात ही लढाई सुरु आहे. केवळ सत्ता एवढाच विषय रोज माध्यमात येत असून राज्याचा विकास, सामन्यांच्या समस्या, वाढती महागाई अशा कुठल्याच गोष्टीना सद्या तरी थारा दिसत नाही. सामान्य माणूस हे सगळे निमुटपणे पहात असून आता निवडणूक येण्याचीच वाट पहात आहे. नकारात्मक वातावरणाला सामान्य माणूस देखील वैतागलेला दिसत असून राजकारण ज्या पातळीला जात आहे अशी पातळी राज्यात पहिल्यांदाच पाहायला आणि अनुभवायला मिळू लागली आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार आणि सेनेची बुलंद तोफ असलेले संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाने आज पुन्हा सनसनाटी निर्माण झाली आहे. 


राष्टवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच मोठे आरोप केलेले असताना आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याबाबत नाव घेवून थेट आरोप केला आहे. आव्हाड यांच्या कुटुंबियांच्या हत्येसंदर्भात एक ऑडीओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे परंतु अद्याप याबाबत पुढे काय झाले हे समोर आलेले नाही. एवढ्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज थेट नावे घेत आपल्या हत्येची सुपारी देण्यात आली असल्याबाबत म्हटले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी एका गुंडाला दिली असल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यावर संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे तर शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी जनतेचा प्रचंड पैसा खर्च होत आहे. विरोधक मात्र आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत आहेत. राज्यात अशी परिस्थिती कधीच आलेली नव्हती त्यामुळे राजकारण हे कुठल्या थराला जात आहे हे उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र पहात आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीही कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद चिघळला असताना  हल्ला होण्याची भीती व्यक्त केली होती. आज त्यांनी दुसऱ्यांदा अशा प्रकारचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. आपल्याला ठार करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून याबाबत आपणास आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानाही माहिती मिळाली आहे. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि  त्याच्या टोळीला माझी हत्या करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आपणास मिळाली असून राजकीय वातावरण पाहता हे आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक वाटत असल्याचे संजय राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्त यानाही पत्र दिले असून या पत्राने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडणारे संजय राऊत हे अत्यंत स्पष्टवक्ते नेते आहेत त्यामुळे राजकारणात त्यांचे शत्रुत्व वाढते आहे. अलीकडेच त्यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडी कडून अटक करण्यात आली होती परंतु न्यायालयाने या राऊत यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याचे सांगत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना शिंदे गटाने मात्र यावर टीका केली आहे. संजय राऊत हे प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करीत असल्याचे शिंदे गटाचे आमदार म्हणू लागले आहेत. स्वत: मात्र सरकारी सुरक्षेच्या कवचात हे आमदार महाराष्ट्रात फिरत आहेत या विसंगीतीचीही चर्चा सुरु झाली आहे.


आपण हे पत्र सुरक्षा देण्यासाठी लिहिलेले नाही, मी एकटा वाघ आहे, मला सुरक्षेची गरज नाही असे देखील संजय राउत यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले आहे. राज्यात कायदा आहे की नाही? असा सवाल शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे (Supari of MP Sanjay Raut's murder,Allegation against MP Shrikant Shinde) तर श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचे शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी मात्र पोलिसांनी याची गंभीर चौकशी करण्याची मागणी केली आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !