शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात मोठे हत्याकांड घडले असून एकाच वेळी तीन महिलांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
नरक 'वास' !
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची डोक्यात दगड घालून तसेच तीक्ष्ण हत्याराचा वापर करून हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली असल्याने मंगळवेढा तालुका तर हादरलाच परंतु अवघा महाराष्ट्र या हत्याकांडाने हादरून गेला आहे. नंदेश्वर येथील दिपाली बाळू माळी (वय २५), संगीता महादेव माळी (वय-५० ), पाराबाई बाबाजी माळी (वय-४५) या तीन महिलांची एकाचवेळी दगडाने तसेच अन्य शस्त्राने खून करण्यात आले आहेत. या तीनही महिलांचे मृतदेह त्यांच्या घरासमोर छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडल्याचे दिसून आले. ही घटना समोर येताच प्रचंड खळबळ उडाली असून त्यांच्या घराशेजारील समाधान लोहार या तरुणाने हे हत्याकांड केले असण्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
नंदेश्वर येथील महादेव माळी यांच्या कुटुंबातील या महिला असून मृतात त्यांच्या दोन बहिणी आणि एका सुनेचा समावेश आहे. दीपाली बाळू माळी ) ही महादेव माळी यांची सून आहे. तर पारूबाई बाबाजी माळी, संगीता महादेव माळी या दोन बहिणी आहेत. एवढे मोठे हत्याकांड करण्याचे कारण समोर आले नसून ही घटना घडताच पोलीस अत्यंत वेगाने या तपासाला लागले आहेत. संशयित तरुण आणि एका महिलेचे किरकोळ स्वरूपाचे भांडण सुरु असताना अन्य दोन महिला भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला आणि यात तीनही महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येताना दिसत आहे परंतु पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नंदेश्वर येथील हे माळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असून जय भवानी चौकात त्यांचे एक हॉटेल आहे. महादेव माळी यांच्या आईचे अवघ्या दहा दिवसांपूर्वी निधन झाले आहे त्यामुळे या कुटुंबात शोकाचे वातावरण असतानाच ही अत्यंत धक्कादायक आणि मोठी घटना घडली आहे. महादेव माळी आणि जया माळी हे दोघे हे हॉटेल चालवतात. त्यांना त्यांचा मुलगा दत्तात्रय हा हॉटेलसाठी मदत करतो तर त्यांचा दुसरा मुलगा बाळू माळी यांचे कापडाचे दुकान आहे. भयंकर हत्याकांड झाले तेंव्हा त्यांच्या घरात कुणी पुरुष मंडळी उपस्थित नव्हते. बाळू माळी आणि जया माळी हे दोघेही परगावी गेले होते. त्यांच्या घरात एक चार वर्षाचा मुलगा होता. या हत्याकांडातून तो मात्र बचावला गेला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावाच्या जवळच माळी कुटुंबाची वस्ती असून येथे हे हत्याकांड घडले आहे. सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, मंगळवेढा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली, शिवाय श्वानपथक देखील पाचारण करण्यात आले होते. या हत्याकांडाची माहिती काही वेळेत मंगळवेढा तालुक्यात गावोगाव पसरली आणि पुढे राज्यभर या घटनेची माहिती झाली. (Murder of three women in Solapur district, a shocking incident) या हत्याकांडामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले आहे. एवढी भयानक आणि भयंकर घटना घडण्यामागे नेमके काय कारण असू शकेल हा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांच्या मनात या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !