BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ फेब्रु, २०२३

एक आवाज आणि शेतकऱ्याचे झाले तुकडे तुकडे !

 


शोध न्यूज : मोबाईलच्या स्फोटामुळे एका शेतकऱ्याचे अक्षरश: तुकडे तुकडे झाल्याची घटना समोर आली असून मोबाईल जेवढा उपयुक्त तितकाच तो धोकादायक (Mobile explosion) आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. 


मोबाईल हे संपर्काचे आजच्या काळातील सर्वोत्तम माध्यम आहे आणि सामन्यातील सामान्य व्यक्तीपासून याचा वापर सगळेच करीत असतात. त्यात स्मार्ट फोन हा विविध कामांसाठी उपयोगाचा बनला असल्याने नव्या पिढीच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून हा मोबाईल समोर आला आहे. विद्यार्थ्यांना देखील अभ्यासासाठी याचा उपयोग होत आहे  परंतु काही चुकीच्या वापराने आणि कधी अनावधानाने अनुचित घटना देखील घडत असतात.  मोबाईलचे स्फोट होणे ही काही नवी बाब नाही, खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट होण्याचाही काही घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे मोबाईल वापरकर्ता मोठ्या प्रमाणात भाजला गेला आहे पण आता उजैन येथून एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार्जिंग करण्यासाठी लावलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आणि हा स्फोट साधासुधा नव्हता तर एका शेतकऱ्याचे शरीर या स्फोटाने छिन्नविच्छिन्न करून टाकले आहे. या घटनेने मोबाइलबाबत सतर्कता बाळगणे किती महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 


बडनगर येथील रुनिजा रस्त्यावरील शेतात काम करीत असलेल्या दयाराम बारोट या साठ वर्षे वयाचे शेतकरी अशा मोबाईल दुर्घटनेचे बळी ठरले आहेत. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा असा स्फोट झाला की या शेतकऱ्याचे तुकडे तुकडे झाले असून हा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला आहे. या ठिकाणी मोबाईलचे देखील अवशेष सापडले असून मोबाईल चार्जिंग सुरु असताना शेतकरी मोबाईलवर बोलत असताना ही घटना घडली असावी असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी या घटनास्थळाची खूप बारकाईने तपासणी केली असून मोबाईलचे विखुरलेले अनेक भाग येथे आढळून आले असून मोबाईल चार्जिंगला लावला होता त्यावेळी स्फोटाची ही घटना घडली असावी असे प्रथमदर्शनी दिसत आहे. शिवाय विजेचा पॉवर पॉईंट देखील पूर्णपणे जळाला आहे. शेतकरी बोराट यांची तर अत्यंत वाईट अवस्था झाली असून त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला आहे. मानेपासून छातीपर्यंत जखमा दिसत असून बाकी मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आहे. या ठिकाणी अन्य कुठलेही स्फोटक पदार्थ अथवा साहित्य नसून केवळ मोबाईलचे अवशेष आहेत आणि ते पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


मोबाईल हा नियमित वापराचे एक माध्यम झाले असून प्रत्येकाजवळ हा मोबाईल असतो. वापर सगळेच करतात परंतु काळजी घेण्याची कुणालाच जाणीव नसते त्यामुळे अशा घटना घडून जातात. (Farmer dies in mobile explosion, body dismembered)आकाशात वीज चमकत असते तेंव्हा मोबाईल वापरू नये, मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना मोबाईलवरून बोलू नये अशा अनेक सावधगिरीचा सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जातात परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. सावधगिरी न बाळगल्यास क्वचित अशा मोठ्या घटना घडतात त्यामुळे मोबाईल वापराताना देखील पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे हेच या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !