BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ फेब्रु, २०२३

कोट्यवधींची शेतजमीन हडप केल्याचे मोठे प्रकरण उघडकीस !

 


शोध न्यूज : सोलापूर कोट्यवधीची जमीन हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तलाठी, सर्कल यांच्यासह १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


'जे नसेल ललाटी, ते लिहील तलाठी ' अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. जमीन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असतात. कागदपत्रात फेरफार करून दुसऱ्याच्या नावाची जमीन आपल्या नावावर करून घेतली जाते आणि कित्येक काळ ही भानगड उजेडात येत नाही. कधी तलाठ्याला फसवून तर कधी तलाठ्याला हाताशी धरून हे उद्योग केले जातात. जेंव्हा अशी प्रकरणे उघडकीस येतात तेंव्हा सगळेच तुरुंगात जाऊन बसतात. सांगोला तालुक्यातील एक मोठे प्रकरण असेच उघडकीस आले असून या फसवणूक प्रकरणाने अनेकांना धक्का बसला आहे.  सांगोला तालुक्यातील काळूबाळूवाडी हद्दीत असलेली कोट्यवधी रुपयांची किंमत असलेली शेतजमीन हडप करण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे त्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी तब्बल १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मिरज येथील डॉक्टर सचिनकुमार सुगाणावर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.  रत्नागिरी- नागपूर महामार्गाला लागून असलेली ही जमीन बोगस शपथपत्र करून आपल्या नावावर करून घेण्याचे मोठे कारस्थान समोर आले आहे. या प्रकरणी मिरज तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील प्रमुख  संशयित आरोपी राहुल कुमार सुगाणावर  याच्यासह त्याची आई, दोन बहिणी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकारामध्ये गावचे तलाठी, सर्कल आणि आरोपी राहुल सुगाणावर यास मदत करणाऱ्या नऊ नातेवाईकांचा संशयित म्हणून समावेश आहे. जमीन हडप करण्यासोबत या प्रकरणात चोरीचा गुन्हा देखील दाखल केला गेला आहे सदर शेतजमिनीवर असलेले सुमारे ६० लाख रूपये किंमतीचे लोखंडी अंगल, पत्रे आणि इतर साहित्य चोरीस गेल्याचे डॉ. सुगाणावर यांनी म्हटले आहे. 


सदर जमीन सुकुमार सुगाणावर यांच्या नावावर होती परंतु त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ही जमीन राहुल सुगाणावर याने ही जमीन आपल्या वडिलाच्या म्हणजे कुमार सुगाणावर यांच्या मालकीची असल्याचे खोटे शपथपत्र सादर केले. त्याच्या आधाराने ही जमीन आपल्या आणि आई तसेच दोन बहिणी यांच्या नावावर करून घेतली. तसेच सदर जमीन नावावर झाल्यानंतर त्यावरील लोखंडी अँगल, पत्रे, जाळीचे कंपाऊंड असा ६० लाखाचा मुद्देमाल विक्री केला. या प्रकरणी   तलाठी आणि सर्कल यांनी मदत केली असल्याचा संशय फिर्यादीत व्यक्‍त करण्यात आला आहे. . त्यानंतर सदरची जमीन विक्रोसाठी काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कोठेही तक्रार करू नये म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.  हा प्रकार उघडकीस आला तेंव्हा फिर्यादी डॉक्टरांनी सांगोला पोलीसात फिर्याद दिली आणि पोलिसांनी तलाठी, सर्कल यांच्यासह १३ जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला.


बोगस शपथपत्र करून फसवणूक करीत जमीन हडप केल्यानंतर ही जमीन विक्रीस काढण्यात आली. आधी दुसऱ्याची जमीन आपल्या नावावर करून घेतली आणि नंतर ती विक्री करण्याचा डाव आखण्यात आला. परंतु येथेच हा प्रकार उघडकीस आला. तलाठी, मंडलाधिकारी यांच्यासह नातेवाईक देखील या प्रकरणी आता भलतेच गोत्यात आले आहेत. (A big case of usurpation of valuable agricultural land revealed!)हा गुन्हा उघडकीस आल्यावर तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी मात्र सारवासारव करण्यास सुरुवात केली असून नावातील साधर्म्यामुळे हे घडले असल्याचे सांगू लागले आहेत. पोलीस तपासात मात्र आता सगळ्यांचे सगळे कारस्थान बाहेर येणार आहे.





 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !