मुंबई : शेतकरी आणि सात बाराचा उतारा यांचा घनिष्ठ संबंध आहे परंतु हा सात बारा उताराचा आता बंद करण्यात आला असून तसा निर्णय शासनाने घेतला आहे.
शेतकरी म्हटलं की सात बारा उतारा हा ठरलेलाच असतो आणि हा उतारा त्याला जागोजागी आवश्यक असतो. सदर उतारा म्हणजे शेतकऱ्याच्या शेताचा चेहरा असतो. विविध कामासाठी शासनाच्या पातळीवरून हा उतारा मागितला जातो. शेताच्या संबंधी अत्यंत महत्वाचा कागद म्हणून या उताऱ्याकडे पहिले जाते आणि शेतकऱ्याच्या मालकी हक्कासह अन्य महत्वाच्या बाबींची माहिती या उताऱ्यावर असते. असे असले तरी आता काही ठिकाणी हा सात बारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
शहरांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असताना शेत जमिनी संपत निघाल्या आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमिनी शिल्लक राहिल्या नसल्याने हा सात बारा बंदच करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सद्या तरी हा निर्णय सरसकट नाही पण काही ठिकाणी मात्र हा निर्णय लागू करण्यात आला आहे. ज्या शहरात सिटी सर्व्हे झाला आहे तरीही सात बारा उतारा सुरु आहे अशा ठिकाणी सात बारा उतारा बंद करण्याचा हा निर्णय आहे. सात बारा ऐवजी प्रॉपर्टी कार्ड सुरु ठेवण्यात येणार आहे.
राज्यात अनेक शहरांचा विस्तार झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणात होत आहे. हा विस्तार शेतजमिनीवर होत असल्याने शेत जमिनी संपत निघाल्या आहेत. अनेक शहरात शेत जमिनी शिल्लक उरलेल्याच नाहीत. सात बारा उताऱ्याचे रूपांतर प्रॉपर्टी कार्डमध्ये झालेला असून कर चुकविण्यासाठी तसेच अन्य लाभासाठी सात बारा वापरण्यात येतो. हे प्रकार टाळता यावेत यासाठी सात बारा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्याची सुरुवात पुण्याच्या हवेली तालुक्यासह सांगली, मिरज, नाशिकपासून होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला की राज्यभर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !