BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२३

मुलांना वाचविण्यासाठी धावलेल्या आईचाच झाला मृत्यू !


शोध न्यूज : खेळत असलेल्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्यांना वाचविण्यासाठी आई धावली परंतु दुर्दैवाने दोन्ही मुले बचावली पण आईचा मात्र मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.


मुले संकटात आली की आई आपल्या जीवाची पर्वा न करता जीवाच्या आकांताने धावत असते. माणूस असो की प्राणी, आपल्या बछड्यावर जीवापाड प्रेम करीत असतात. कुठलीही आई आपल्या जिवापेक्षा आपल्या लेकरांची अधिक काळजी घेत असते आणि अशा काळजीतच सांगली जिल्ह्यात ही अत्यंत वेदनादाई घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील तडवळे गावात ही घटना घडली.उतारावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरने धोका दिला आणि मुलांच्या जीवावर संकट आले. या संकटातून मुले सहीसलामत बचावली पण त्यांना वाचवायला धावलेली आई मात्र मृत्युमुखी पडली. त्यामुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.  उतारावर एक ट्रॅक्टर उभा केलेला होता आणि तो अचानक ड्रॉयव्हर शिवाय चालू लागला. समोरच्या बाजूला दोन मुले खेळत होती त्यामुळे काही अघटित घडण्याची परिस्थिती निर्माण झाली. 


दोन वर्षे वयाचा कृषान्त आणि चार वर्षे वयाची मुलगी दुर्वा हे खेळत असताना उतारावरील ट्रॅक्टर आपोआप आणि ड्रॉयव्हरशिवाय पुढे सरकत असल्याचे आई संचित संपत पाटील यांच्या लक्षात आले. हा ट्रॅक्टर मुलांना चिरडून टाकेल या भीतीने आईचे काळीज गोठून गेले. मुलांच्या अंगावर ट्रॅक्टर जाईल हे दिसू लागल्याने आई संचिता यांनी जिवाच्या आकांताने धाव घेतली परंतु धावताना संचिता यांचा पाय घसरला आणि त्यांच्या डोक्याला ट्रॅक्टरचा नांगर लागला. यात आई गंभीर जखमी झाली. संचिताला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण उपचारादरम्यान संचिता पाटील (२८) यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. (The mother who ran to save the children died) संकटातून दोन्ही मुले बचावली पण वाचवायला गेलेल्या आईचाच अशा प्रकारे शेवट झाला त्यामुळे मुले आईविना पोरकी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !