BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ जाने, २०२३

विचित्र योगायोग आणि सहा भाविकांचा अपघाती मृत्यू !

 



शोध न्यूज : यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन एकाचवेळी सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू होण्याची दुर्घटना घडली आहे. 

कुणी आहे का ?

✪🅾 दुर्गंधीचा दुसरा दिवस! 🅾 ✪ 🅾️ लक्ष्मीटाकळी उपनगरात गटार तुंबलेलीच ! ३२ दिवसानंतर वाट मोकळी केली आणि दोन दिवसात परिस्थिती जशीच्या तशी ! नागरी आरोग्याची दखल कुणी घेईल काय ? ... ✪


अपघाताचे प्रमाण वाढलेले असले तरी देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या वाहनाचे अपघातही अधिक प्रमाणात होत आहेत. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी अथवा वारीच्या निमित्ताने निघालेल्या अथवा परत गावी येताना अनेक वाहनांना अपघात होऊन भाविकांचे प्राण जात आहेत. देवदर्शनासाठी जाताना अनेक भाविक मिळून एखादे वाहन भाड्याने करतात आणि त्यात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक भाविक कोंबले जातात. शिवाय वाहनाचे भाडे वाढू नये म्हणून विनाविश्रांत प्रवास करीत असतात आणि यातच असे अपघात होतात. सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर मात्र नशिबानेच काळाचा घाला घातला गेला आहे आणि सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतात दोन लहान मुलींचा देखील समावेश आहे. 


एका पिकअप वाहनातून तब्बल २३ भाविक प्रवास करीत असताना रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील विठ्ठल देवस्थानजवळ हा अपघात घडला आहे. २३ भाविकांना घेवून निघालेले पिकअप भरधाव वेगात असताना एका झाडावर आदळले.  मृत्युमुखी पडलेले भाविक पायी चालत निघाले होते पण मृत्यूने त्यांना बोलावून घेतल्याचा प्रकार घडला आहे. रामदुर्ग तालुक्यातील हलकुंद या गावातील भाविक पायी चालत यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी निघालेले होते. पाठीमागून एक पिकअप वाहन आले आणि या भाविकांना पाहून चालकाने गाडी थांबवली. 


चालकाने स्वत:च गाडी थांबवून या भाविकांना गाडीत बसण्यास सांगितले.  मंदिराच्याच रस्त्याने निघालो आहे त्यामुळे तुम्हाला मंदिरापर्यंत घेवून जातो असे या चालकाने पायी चालत निघालेल्या भाविकांना सांगितले. यातील एकाची भाविकाने वाहनाला थांबण्याचा इशारा केला नव्हता की वाहनातून प्रवास करण्याचा त्यांचा मनोदय नव्हता. भाविक या गाडीत बसले आणि अवघ्या काही मिनिटात हे वाहन एका झाडावर जाऊन आदळले. त्यामुळे सहा भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. हनुमाव्वा (वय २५ वर्षे), दीपा (वय ३१ वर्षे), सविता (वय १७ वर्षे), सुप्रीता (वय ११ वर्षे), मारुती (वय ४२ वर्षे), इंदिरव्वा (वय २४ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. अन्य काही भाविक जखमी झाले आहेत.


मृत्यू यायचा असला की तो कुठल्याही मार्गाने आणि न विचारता येतो असे म्हणतात त्याचाच हा एक जिवंत अनुभव आहे. भाविक पायी निघाले होते, दर्शनासाठी जाताना त्यांनी कुठल्या वाहनांचा विचार देखील केला नाही की रस्त्यावरून जाताना जाणाऱ्या वाहनांना थांबण्याचा इशाराही केला नाही. (Strange coincidence! Accidental death of six devotees) एक वाहन पाठीमागून येते आणि थांबून गाडीत बसण्याचा आग्रह होतो, गाडीत बसताच काही क्षणात मोठा अपघात होतो आणि त्यात सहा भाविकांचा मृत्यू होतो हे सगळे धक्कादायक ठरले आहे. पाच भाविक जागीच तर एकाचा उपचारासाठी जाताना मृत्यू झाला आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !