BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२३

राष्ट्रवादी नेत्याची पुन्हा भाजप प्रवेशाची चर्चा !

  


शोध न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुने नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरु झाली असून आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांना जाहीरपणे निमंत्रण दिल्याने राजकारण ढवळू लागले आहे. 


महाविकास आघाडी सत्तेवरून पायउतार झाल्यापासून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उड्या मारण्याचा जोरदार खेळ रंगला आहे. रोज कुणी ना कुणी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करीत आहेत. विशेषत: ठाकरे शिवसेनेतून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच शिंदे गटातून बाहेर पडणाऱ्याच्या देखील बातम्या येऊ लागल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही काळापासून येत राहिल्या परंतु गेल्या महिन्यांपासून या चर्चांना ब्रेक लागला होता. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि माढा मतदार संघातील आमदार बबनदादा शिंदे हे भाजपसोबत जात असल्याच्या चर्चेने सोलापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. पक्षांतरबंदी कायदा असल्यामुळे आ. शिंदे हे लगेच भाजप प्रवेश करणार नाहीत परंतु राजन पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. 


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो झळकले आणि या चर्चांना ब्रेक लागला होता पण आता पुन्हा हा विषय उफाळून वर आला आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील एका कार्यक्रमास माजी आमदार राजन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते आणि यावेळी भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांनी पाटील याना भाजपात येण्याचे जाहीर निमंत्रणच देऊन टाकले. माजी आमदार पाटील यांनी आता थेट निर्णय घेऊन भाजप प्रवेश करावा असे निमंत्रण आ. राऊत यांनी दिले आणि पुन्हा नव्या चर्चेला विषय मिळाला आहे. आ. राऊत यांनी दिलेले हे निमंत्रण वाटते तेवढे सहज नसून यात पडद्याआड काहीतरी 'शिजले' असल्याच्या चर्चा देखील बाहेर येताना दिसत आहेत. आ. पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या निमंत्रणावरूनच राजन पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते आणि पाटील कुटुंबाचा सल्ला घेऊनच आ. राजेंद्र राऊत यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते अशी चर्चा देखील सुरु झाली आहे. 


हा कार्यक्रम म्हणजे पाटील यांच्या भाजप प्रवेशापूर्वी करण्यात येत असलेली 'मशागत' असल्याचा अर्थ लावण्यात येत असून अचानक भाजप प्रवेश करण्याऐवजी कार्यकर्त्यात पक्ष बदलण्याची मानसिकता तयार केली जाऊ लागली असल्याचे देखील बोलले जाऊ लागले आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी मात्र आमदार राऊत यांच्या विधानाची दिशा बदलली असल्याचे दिसत आहे. "प्रत्येकजण आपला पक्ष वाढेल यासाठी प्रयत्न करीत असतो त्याप्रमाणे आमदार राऊत यांनी तसा प्रयत्न केला आहे. भाजपात येण्याचे निमंत्रण देवून आ. (Solapur Politics, NCP leader talks about joining BJP again)  राउत यांनी त्यांची जबाबदारी निभावली आहे" असे माजी आमदार राजन पाटील यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र पाटील कुटुंबियांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. 



.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !