BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२३

शुद्ध पाणी देऊन तरुण सरपंचाने फेडले गावाचे ऋण !


शोध न्यूज : गावाने एका तरुणाला दिली सरपंचपदाची भेट आणि त्या उपकाराची, प्रेमाची परतफेड करीत युवा सरपंचाने गावासाठी स्वखर्चातून शुद्ध पाण्याशी व्यवस्था करून गावाचे ऋण फेडण्याचे प्रयत्न केले आहेत. 


✪🅾 संतापजनक! 🅾 ✪ 🅾️ मंगळवेढ्याच्या उजनी कार्यालयात कर्मचारी महिलेचा छळ ! जाणीवपूर्वक त्रास देणारे कर्मचारी येणार गोत्यात ! ✪


राजकारण हे अलीकडे बदनाम होत चाललेले नाव आहे, लोकांची सेवा करण्याचा बहाणा करून निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी नंतर तुरुंगात जाताना दिसतात. आपले घर भरणे यालाच ते जनसेवा म्हणतात आणि मग तुरुंगाची हवा खायला जातात. निवडणुक प्रचारावेळी हात जोडणारे आणि कमरेपासून वाकून नमस्कार करणारे काही जण निवडून आल्यावर त्याच मतदारांवर हात उगारतात. जनतेच्या सेवेची दिलेली सगळी वचने विजयाच्या गुलालासोबत हवेत विरून जात असतात. विजय घोषित झाला की नवा तोरा जन्माला येतो आणि मतदारांना दिलेली आश्वासने तेथेच अखेरचा श्वास घेत असतात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या काही सरपंचानी त्यांच्या कृतीने समाजाला दखल घ्यायला लावली आहे. एका महिला सरपंचानी तर तोरा सोडून पहिल्याच दिवशी हातात केरसुणी घेतली आणि ग्रामपंचायत कार्यालय झाडून स्वच्छ केले तर त्यानंतर गावाच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वखर्चाने एका सरपंचाने केली असल्याचे समोर आले. 


येवल्याच्या चांदगाव येथील गावकऱ्यानी प्रस्थापितांना बाजूला ठेवत प्रणव साळवे या एकवीस वर्षाच्या तरुणाला सरपंचपदी निवडून दिले. प्रणवच्या घरालाच राजकीय वारसा असून त्यांच्या आधी तिघांनी या खुर्चीवर बसण्याचा मान मिळवला होता. थेट निवडणुकीत मात्र गावकऱ्यानी प्रणव साळवे यांना पसंती दिली. या तरुणाने निवडून येताच गावाच्या आणि नागरिकांच्या भल्याचा विचार सुरु केला. कुठल्या सरकारी योजनेच्या भरवशावर आणि शासनाच्या कुठल्या निधीची खरी खोटी स्वप्ने न दाखवता आधी आपलाच खिसा हलका केला आणि गावकरी मतदारांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. दिवसाला ५ हजार लिटर क्षमता असलेल्या आरओची स्वखर्चाने गावासाठी व्यवस्था करून गावाला पिण्यासाठी शुद्ध पाणी कसे मिळेल याचा प्रयत्न केला. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असुस्न आता महिनाभरात ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.


निवडून येताच तरुण सरपंचाने पदरमोड करून गावासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केल्याने गावकरी समाधानी असून हा तरुण गावासाठी नक्की काही करेल असा विश्वास गावकरी व्यक्त करू लागले आहेत शिवाय आपली पसंती एकदम योग्य होती याची जाणीव देखील त्यांना झाली आहे .(The sarpanch provided clean water for the village at his own expense) तरुण सरपंच साळवे हे गावाच्या विकासासाठी आणि गावातील नागरिकांसाठी नक्कीच काही भरीव करतील याचा ठाम विश्वास गावकरी आता व्यक्त करू लागले आहेत. "खाण्यापेक्षा देण्याची' प्रवृत्ती साळवे यांच्याकडे असल्याचेच या उपक्रमातून दिसून आले असल्याचे गावकरी सांगू लागले आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !