BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जाने, २०२३

फटाका कारखाना स्फोट, मृतांची संख्या वाढली !

 




शोध  न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली  असून स्फोटात महिला उडून उसाच्या शेतात पडल्या होत्या. 


काळापासून नव्या वर्षाचा आनंद साजरा केला जात असताना आज  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीच्या जवळ असलेल्या फटक्याच्या कारखान्यात प्रचंड स्फोट झाला आणि सुरुवातीला या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले गेले परंतु मृतांचा आकडा आता ९ वर गेल्याची माहिती सांगितली जात आहे. हा आकडा आणखी वाढण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.  शोभेची दारू तयार करणाऱ्या एका कारखान्यात मोठा स्फोट झाला आणि यामुळे आग प्रचंड भडकली, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात उसळताना अत्यंत भयावह चित्र पाहायला मिळाले. या कारखान्यांत ४० पेक्षा अधिक कामगार काम करीत असताना ही दुर्घटना घडली आहे.या कारखान्यात फटाके बनविण्याचे काम सुरु असतांना अचानक स्फोट झाला आणि मोठी आग लागली त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. 


  • मृतांच्या आकड्याबाबत विसंगती !
  • प्रत्येकाची माहिती वेगळी
  • मदत मिळण्यास विलंब 


चार एकर परिसरात हा कारखाना विस्तारला आहे. सदर फटाका फॅक्टरीमध्ये बांगरवाडी, वालवड, उकडगाव या भागातले कामगार काम करत होते. सदर दुर्घटनेत ९ जणांचे मृतदेह हाती आले असल्याचे काही जण सांगत राहिले परंतु हा आकडा चुकीचा असण्याची शक्यता आहे. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  दुपारी या कारखान्यात कामगार काम करीत असताना अचानक हा स्फोट झाला आणि प्रचंड आवाजाने परिसर हादरून गेला. पाच दहा किमी अंतर परिसरात हा आवाज ऐकू गेल्याचे स्थानिक सांगत आहेत. आकाशात उठणारे धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा तसेच झालेला प्रचंड आवाज यामुळे परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी धावले आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले. अग्निशामक दल तसेच प्रशासन यांना कळवूनही वेळेत रुग्णवाहिका देखील दाखल होऊ शकली नाही याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला .


मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी अत्यंत भयावह परिस्थिती पहिली असल्याचे सांगत आहेत. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे नेमके किती नुकसान आणि जीवितहानी झाली याचा अंदाज येत नव्हता. कारखाना तर पूर्ण जळून खाक झाला परंतु जीवितहानीचा नेमका अंदाज येत नव्हता. सुरुवातीला दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले पण हा आकडा वाढत गेला आणि नंतर पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले.  प्रत्यक्षात मात्र यात चार मृत्यू झाल्याची पुष्टी होत आहे, प्रचंड स्फोटामुळे महिला उडून जवळच्या उसाच्या शेतात गेल्या होत्या. या शेतात महिलांचे मृतदेह आढळून आले आहेत.


दुर्घटना घडल्यानंतर येथे प्रचंड गोंधळ उडालेला होता आणि अनेकजण मदतकार्यात व्यस्त होते. यावेळी दिली जात असलेली माहिती विसंगत होती. मृतांच्या आकड्याबाबत वेगवेगळी माहिती मिळत होती. सुरुवातीला तीन मृतापासून हा आकडा पाच आणि नंतर ९ सांगण्यात आला प्रत्यक्षात मात्र हे आकडे चुकीचे असल्याचे दिसत होते. या दुर्घटनेत ४ महिलांचा मृत्यू झाला असल्याचेच दिसत आहे.


सुमन ऊर्फ सुमित्रा ज्ञानोबा जाधवर (वय ५६, रा. वालवड, ता. बार्शी) व गंगाबाई मारुती सांगळे (वय ५०, रा. उक्कडगाव), मीना बाबासाहेब मगर (वय ५२, रा. पांगरी, ता.बार्शी) व मोनिका संतोष भालेराव (वय ३०, रा. वालवड) असे या मृत पावलेल्या महिलांची नावे आहेत.  जखमी कौशल्या सुखदेव बगाडे (वय ३०, रा. पांगरी) यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. 


दुर्घटनेतील जखमींना वेळीच उपचार मिळाले असते तर हा आकडा कमी दिसला असता असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. (Cracker factory explosion, death toll increased!) रुग्णवाहिकेसाठी तातडीने फोन करूनही वेळेत मदत मिळाली नाही म्हणून मृतांचा आकडा वाढत असल्याचा संताप उपस्थित करू लागले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !