BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जाने, २०२३

पंढरपूर तालुक्यात पित्याला पेट्रोल टाकून जाळले, दगडाने, ठेचून मारले !



शोध न्यूज : सरत्या वर्षाला निरोप देण्याची सगळीकडे लगबग सुरु असताना पंढरपूर तालुक्यात मात्र अनैतिक संबंधाच्या कारणावरून पेट्रोल टाकून पित्याला जिवंत जाळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडस्कीस आला आहे. 



जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ज्याची त्याची लगबग सुरु होती आणि याच दरम्यान दुसरीकडे आपल्याच पित्याचा काटा काढण्याचे कारस्थान रचले जात होते. अखेर नवे वर्ष उजाडण्याआधीच दोन अल्पवयीन भाऊ बहिण यांची मदत घेत आपल्याच पित्याला आधी पेट्रोल टाकून पेटवले आणि नंतर ठेचून मारल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत घडली आहे. या घटनेत सगळीच अनैतिक संबंध आणि प्रेमप्रकरणाची मोठी गुंतागुंत असल्याचे समोर आले आहे. वडिलाच्या निधनानंतर आपल्या आईशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याचा राग दोन अल्पवयीन भाऊ बहिण यांना होता तर आपल्या प्रेमप्रकरणास विरोध केला जात असल्याचा राग मुलाच्या मनात होता. अखेर या तिघानी कारस्थान रचून पंढरपूर येथील डाळे गल्लीतील ५० वर्षे वयाच्या अफजल महमद शरीफ बागवान  याचा अत्यंत खतरनाक पद्धतीने काटा काढला आहे.  


 सोहेल बागवान याने दोन अल्पवयीन बहिण भाऊ यांची मदत घेत पित्याच्याच डोळ्यात चटणी टाकली आणि पेट्रोल ओतून पेटवून दिली. हा सगळा प्रकार होऊ लागला असताना अफजल पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याचे पाय बांधून दगडाने चेहरा आणि डोके ठेचून त्यांना मारण्यात आले . ३० डिसेंबरच्या रात्री आधी अफजल यास जुना कासेगाव रस्त्यावर नेण्यात आले आणि तेथे आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून हा थरारक खून करण्यात आला. (Pandharpur Crime) या प्रकरणाचा उलगडा होताच पोलिसांनी लातूर येथील दोन अल्पवयीन भाऊ, बहिण यांना ताब्यात घेत पंढरपूरच्या डाळे गल्लीतील सोहेल अफजल बागवान याला जेरबंद केले आहे.  


अफजलचा आक्रोश !

खुनाचा प्रकार घडत असताना अफजल आक्रोश करीत होता. 'वाचवा वाचवा' असा धावा तो करीत होता. हा आक्रोश श्याम सुरवसे यांनी ऐकला. कासेगाव येथील बळीराजा कोल्ड स्टोअरेज जवळील शाम सुरवसे हे दूध डेअरीमध्ये दूध घालून परत येत होते. आवाजाच्या दिशेने त्यांनी पहिले तेंव्हा एकदम आगीचा भडका उठल्याचे त्यांना दिसले. त्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील दौलतराव जाधव यांच्यापर्यंत पोहोचली आणि मग त्यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली.


मुलांना पकडून ठेवले 

पोलीस घटनास्थळी धावले परंतु तत्पूर्वी तेथील काही नागरिकांनी दोन अल्पवयीन मुला मुलीला पकडून ठेवले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अफजल याला मारून टाकल्याची संपूर्ण हकीगत सांगितली. हे दोघे अल्पवयीन भाऊ बहिण असून अफजल याचे त्यांच्या आईशी असलेले अनैतिक संबंध त्यांना मान्य नव्हते. ते पूर्वी पंढरपूर येथील डाळे गल्लीत राहत होते आणि त्यांचं वडिलाच्या निधनानंतर त्याच्या आईशी अफजलचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. याचा राग या अल्पवयीन भावंडाना होता.  


--आणि ठेचून मारले !

आईबरोबर अफजल बागवान याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातूनच बागवान हे सतत घरी येऊन या भावंडांना त्रास देत होता. म्हणून त्यांना मामाचे घरी जायचे आहे, असे सांगून रिक्षाने जुना कासेगाव रोड वरील म्हसोबा मंदिरापर्यंत नेले. घटनास्थळी आधीच जाऊन सोहेल हा थांबलेला होता.  रिक्षातून उतरून पायी जात असताना  निर्जनस्थळी अफजलच्या  डोळ्यात चटणी टाकली व अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यामुळे ओरडत ते पळू लागल्याने पुन्हा पकडून दोरीने पाय बांधले व चेहऱ्यावर, डोक्यात  दगडाने ठेचून निर्घृण खून केला, अशी माहिती त्यांनी दिली.


असे ठरले कारस्थान !

सदर घटनेत पोलिसांनी अत्यंत बारकाईने चौकशी सुरु केली त्यावेळी यातील एकेक पदर उलगडत गेले  मयत अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल व यातील अल्पवयीन मुलगी यांचेही प्रेम प्रकरण सुरू असल्याचे समोर आले. या दोघांना लग्न करायचे होते, मात्र, अफजल यांचा विरोध होता. त्यामुळे सोहेलच्या सांगण्यावरूनच अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ गुरूवारी (दि. २९) रात्री ११ वाजता लातूर येथून रेल्वेने निघून शुक्रवारी (दि.३०) सकाळी पंढरपुरात पोहोचले. त्यांची व सोहेलची बसस्थानका समोरील गल्लीत भेट झाली. त्या ठिकाणी खुनाचा प्लॅन ठरविला गेला. 


जुन्या कासेगाव रस्त्यावर अगोदरच सोहेल जाऊन थांबला होता. अल्पवयीन बहीण-भाऊ अफजल बागवान यांना तेथे घेऊन गेले. त्यांनी डोळ्यात चटणी टाकल्यावर सोहेल याने सोबत आणलेले पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. ते पळू लागल्यावर पाठलाग करत पकडून खाली पाडून पाय बांधले. तसेच तिघांनी त्यांच्या चेहऱ्यावर व डोक्यात दगडाने ठेचून खून केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. ( Father's murder, Crushed with stones, burnt with petrolया प्रकरणी अल्पवयीन बहीण-भाऊ यांना ताब्यात घेण्यात आले असून सोहेल बागवान यालाही शिताफिने अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलींद पाटील हे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !