BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२३

सोलापूर - पुणे महामार्गावर थरार ... बस चालकाला आला हृदयविकाराचा झटका आणि --

  


शोध न्यूज : धावत्या बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि चाळीस प्रवाशांचे प्राण धोक्यात आल्याचा अंगावर काटा आणणारा थरार सोलापूर - पुणे महामार्गावर घडला परंतु प्रवाशाने बसवर ताबा मिळवत मोठा अपघात टाळला.


राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अनेक धक्कादायक किस्से समोर येत आहेत. धावत्या बसचे ब्रेक फेल होण्याच्या घटनाही घडत आहेत आणि प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. अनेकदा चालकाला बस चालवत असतानाच हृदयविकाराचा त्रास होतो आणि अशावेळी तर प्रवाशांचे प्राण मोठ्या संकटात सापडत असतात. अनेकदा चालक अशा संकटाच्या प्रसंगात देखील कौशल्याने बस बाजूला घेत प्रवाशांचे प्राण वाचवतात. सोलापूर- पुणे महामार्गावर मात्र वेगळाच प्रकार घडला पण प्रवाशाच्या प्रसंगावधानाने चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. बस धावत असताना इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे उदगीरकडून पुण्याकडे निघालेल्या बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि पुढे थरारक थरार सुरु झाला. 


राज्य परिवहन महामंडळाची बस (एमएच २४, एयू ८०६५) ही पळसदेव जवळ आली असताना बस पुलाच्या संरक्षक लोखंडी गार्डला धडकली. रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांना नेमका अंदाज आला नाही परंतु बसमधील प्रवाशांनी चालकाकडे पहिले असता चालकाने मान टाकलेली होती. यामुळे मात्र प्रवाशी घाबरून गेले आणि त्यांनी  आरडा ओरडा सुरु केला. पण याने काहीच फरक पडणार नव्हता. याच बस मधून प्रवास करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सुधीर मारुती रणे यांनी प्रसंगावधान राखत मोठे धाडस केले आणि त्याने धाव घेत बसच्या स्टेअरिंगचा ताबा मिळवला. हॅण्डब्रेकचा वापर करीत त्याने ही अनियंत्रित होत असलेली बस थांबवली आणि पस्तीस ते चाळीस प्रवाशांचा जीव वाचवला. सुधीर रणे हे या बसमधून प्रवास करीत मुबंईला निघाले होते आणि त्यांना वाहन चालविण्याचा मोठा अनुभव होता. याच अनुभवाचा फायदा घेत त्यांनी बसवर नियंत्रण मिळवले. 


बस चालक गोविंद सूर्यवंशी यांची अवस्था अत्यंत बिकट होती आणि रुग्णवाहिका येईपर्यंत वाट पाहणे धोक्याचे होते त्यामुळे सुधीर रणे यांनी ही बस तशीच पुढे चालवत नेत भिगवण गाठले आणि तेथे त्यांना खाजगी रुगणालयात दाखल केले. त्यामुळे चालकास वेळीच उपचार मिळू शकले. रात्रीची वेळ आणि अचानक गुदरलेला थरारक प्रसंग यामुळे जवळपास चाळीस प्रवाशांचे प्राण धोक्यात आलेले होते. (The bus driver suffered a heart attack on the Solapur-Pune highway.) प्रसंग कठीण असल्याचे लक्षांत आल्यावर प्रवाशी प्रचंड घाबरून गेले होते पण एक तरुणाच्या धाडसामुळे प्रवाशांचे जीव वाचलेच शिवाय हृदयविकाराचा झटका आलेल्या बसच्या चालकालाही वेळीच उपचार मिळाले. 


अनर्थ अटळ होता !

बस चालक हृदयविकाराचा झटका आल्याने स्टेअरिंगवरच कोसळले होते आणि बस अनियंत्रित होत पुलाच्या गार्डला धडकली होती. या बसवर वेळीच नियंत्रण आले नसते तर अनर्थ अटळ होता. प्रवाशांना घेवून जाणारी ही बस रस्त्याकडेच्या ट्रान्सफॉर्मरवर आदळली असती किंवा उजनी जलाशयात जाऊन पडली असती. 


  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !