BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२३

'प्रहार' चे बच्चू कडू यांचा अपघात नसून घातपात ? राष्ट्रवादीने व्यक्त केली शंका !

 


शोध न्यूज : प्रहार संघटनेचे दमदार नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्या अपघातबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी घातपाताची शंका व्यक्त केली असून चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.


आमदार बच्चू कडू हे रस्ता ओलांडत असताना त्यांना एक दुचाकीने जोराची धडक दिल्याने बुधवारी यांचा अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला तसेच अन्यत्र जोरदार मार लागला आहे. आपली प्रकृती ठीक असल्याचे आ. कडू यांनी सागितले असले तरीही त्यांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. एक दमदार आणि जनमाणसातील नेता असलेल्या आमदार कडू यांच्या अपघातामुळे अनेकांना धक्का बसला असून त्यांच्या कार्यकर्त्यात देखील अस्वस्थता निर्माण झाले आहे. नेत्यांच्या अपघाताची मालिकाच सुरु झाली असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच आता आ. कडू यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या अपघाताबाबत देखील नुकतीच शंका उपस्थित करण्यात आली असून त्याचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. 


आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झालेली असून त्यांच्या डोक्याला चार टाके पडलेले आहेत. आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि तेंव्हापासून नेत्यांच्या अपघाताची एक मालिकाच सुरु झाली आहे. आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्याही अपघाताच्या घटना ताज्या आहेत त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून लोकप्रतिनिधीनी रात्रीचा प्रवास करू नये असे नुकतेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आवाहन केले होते पण आ. बच्चू कडू हे तर रस्त्यावरून पायी जात असताना ही घटना घडली आहे. आणि याच अपघाताबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत या घटनेची चौकशी केली जाण्याची मागणी केली आहे. मिटकरी यांनी या घटनेबाबत काळजीही व्यक्त केली आहे. 


बच्चू कडू आणि आमचा राजकीय पक्ष वेगळा असला, आमच्यात राजकीय मतभेद असले तरी त्यांनी दिव्यांगांसाठी केलेले काम आपण डोळ्यांनी पाहिलेले आहे. असा व्यक्ती सरकारमध्ये असतानाही सरकारच्या विरोधात बोलतो. असा व्यक्तीला एक दुचाकीस्वार धडक देतो आणि गंभीर जखमी करतो यात काही काळंबेरं आहे असं आपल्याला वाटतं, घडलेल्या या अपघाताची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी ही शंका व्यक्त केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून खळबळ देखील उडाली आहे.  


आ. बच्चू कडू यांनी सद्याच्या सरकार विरोधात सातत्याने बंडाची भूमिका घेतली आहे त्यामुळे त्यांची विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना ? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या नेत्याला साधे खरचटले तरी भाजपकडून लगेच चौकशीची मागणी केली जाते त्यामुळे आता दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सतत झटणाऱ्या, झगडणाऱ्या नेत्याला अशा प्रकारे एक दुचाकीस्वार धडक देत असेल तर त्याचीही चौकशी झालीच पाहिजे असे मिटकरी यांनी म्हटले आहे.  


आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेबाबत भारतीय जनता पक्षाकडे बोट दाखवत शंका आणि संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. बच्चू कडू हे राजकारणात असले तरी समाजकारणासाठीच अधिक झटत असतात, प्रसंगी ते कठोर देखील होतात पण न्यायाची बाजू लावून धरतात यामुळे राज्यभर आ. कडू यांची एक वेगळी आणि प्रभावशाली प्रतिमा आहे. (NCP expressed doubts about the accident of Mla Bachu Kadu of Prahar)अन्य राजकीय नेत्यापेक्षा बच्चू कडू यांचा एक वेगळाच प्रभाव आहे. ठाकरे सरकार पाडण्याच्या बंडात ते सहभागी झालेच कसे ? असा प्रश्नही विचारला जात होता.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !