BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ जाने, २०२३

राज्यात पाऊस घालणार थैमान ! पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता !


शोध न्यूज : उन्हाळ्याची चाहूल लागू लागली असतानाच राज्यात पाऊस थैमान घालण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून यामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


गेल्या महिन्यापासून राज्यातील थंडी वाढली आहे आणि गेल्या काही दिवसापासून हवामान बदलाचा खेळ देखील सुरु आहे. मधूनच थंडी तर मधूनच उकाडा असा खेळ सुरु असताना आणि राज्यातील थंडी गायब होण्याची शक्यता व्यक्त केली असताना पुनः थंडीचा कडाका वाढला आहे. जानेवारी महिना संपुष्टात येऊ लागल्याने उन्हाळ्याच्या चाहूल हळूहळू लागू लागली आहे परंतु मोसम बदलाच्या या दिवसात मध्येच पावसाचे थैमान सुरु होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यान पाऊस झाला तर गहू, हरभरा, केळी, द्राक्ष, आंबा, कांदा, ज्वारी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. गेल्या अनेक वर्षात निसर्गाच्या लहरीचा मोठा फटका शेतकरी आणि त्यांनी कष्टाने जोपासलेल्या पिकांना बसू लागला असून आता पुन्हा याचीच पुनरावृत्ती होण्याचा धोका वाढला आहे. 


थंडी संपून आता उन्हाळ्याला सुरुवात होण्याचे दिवस असताना मध्येच हवामान विभागाने राज्यात मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे यामुळे शेतकरी बांधवांची काळजी वाढवली आहे. सद्याच ज्वारीचे दर सामान्य वर्गाची काळजी वाढविणारे असताना पुन्हा या काळात पाऊस झाला तर गरिबांना मिळणारे दोन घास देखील आणखी महाग होणार आहेत. या आठवड्यात अवकाळी पावसाने दणका दिला तर ज्वारी, गहू, हरभरा, केळी, द्राक्ष, आंबा तसेच कांदा या पिकांना मोठा फटका बसणार आहे. काढणीला आलेली पिके धोक्यात येणार आहेत त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसेच किमान तापमानातील वाढ देखील कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शेतकऱ्याची काळजी वाढवणारा हा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  


 इंदापूर, बारामती, माढा व करमाळा तालुक्याच्या काही भागात ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली आहे. हा पाउस येऊ लागल्याने शेतकरी चिंतेत आहे तोच पुन्हा मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्याच्या वेळीच ढगाळ हवामान तयार होत असून मधूनच थंडी पूर्णपणे गायब होत आहे आणि काही भागात पावसाची हजेरी लागू लागली आहे. (possibility of rain in Maharashtra, big threat to crops) राज्यात कुठे पावसाच्या सरी तर कुठे धुके अशी परिस्थिती दिसून येत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण असा खेळ निसर्गाचा सुरु असून यामुळे पिकांवर परिणाम होत असून पिकांवर रोग पडण्याची देखील भीती व्यक्त होताना दिसत आहे. या सगळ्यांचा परिणाम शेतकरी बांधवांच्या नुकसानीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !