BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ नोव्हें, २०२३

धावत्या रेल्वेने माय लेकरांना चिरडले !




शोध न्यूज : धावत्या रेल्वेने माय लेकरांना चिरडल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना पंढरपूर - सांगोला रेल्वेमार्गावर घडली असून, ऐन दिवाळीत एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.


सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरु असताना आणि प्रकाशाचा एक वेगळा उत्सव साजरा केला जात असताना, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एका कुटुंबावर मात्र शोक करण्याची वेळ आली आहे. पंढरपूर - सांगोला रेल्वेमार्गावर, म्हसोबा मंदिराच्या जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेने दोघांना चिरडले असल्याचे दिसून आले.  एक महिला आणि  एका पुरुषाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला परंतु त्यांची ओळख पटत नव्हती. परंतु सांगोला तालुक्यातील मांजरी येथील पोलीस पाटील, किशोर पाटील यांनी या घटनेबाबत गावातील आरिफ मुजावर यांना दिली. आरिफ यांचा भाऊ आणि आई हे घरी नव्हते त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हे मृतदेह त्यांच्याच आईचे आणि भावाचे असल्याचे दिसून आले आणि दोन्ही मृतांची ओळख पटली. 


माजरी येथील ७५ वर्षे वयाच्या मिजासबी इस्माईल मुजावर आणि त्यांचा ५५ वर्षे वयाचा मुलगा इन्नुस इस्माईल मुजावर अशी या दोघांची नावे असल्याचे समोर आले आहे. इन्नुस मुजावर याची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि त्याच्यावर पंढरपूर येथील एका दवाखान्यात उपचारही सुरु होते. काल मात्र अचानक त्यांच्यासह त्यांच्या आईचाही मृतदेह आढळून आला. (A mother and son were crushed by a running train) या दोघानाही भरधाव वेगातील रेल्वेने चिरडले असल्याचे दिसून आले. या माय लेकरांच्या मृत्यूने परिसर हळहळला असून ही घटना नेमकी कशी घडली याबाबत काहीच माहिती मिळू शकत नाही. आई आणि मुलगा रेल्वे मार्गावर कशासाठी गेले होते ? हा अपघात आहे की आणखी काही ? असे काही प्रश्न उपस्थित होत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत, परंतु ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने अनेकांच्या मनाला वेदना झाल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !