BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२३

स्कुटीच्या हॅण्डलमध्ये विसावला होता विषारी किंग कोब्रा ! VDO


शोध न्यूज : मृत्यू कुठे आणि कसा लपून बसलेला असतो हे कधी कळत नसते, चक्क एका स्कुटीच्या हॅंडलमध्ये आरामात लोळत पडला होता एक अत्यंत विषारी किंग कोब्रा ! त्याची चाहूल लागली म्हणून नाहीतर काय घडले असते याची सहज कल्पना येते.

 

साप, नाग असे विषारी प्राणी हल्ली कुठेही निवारा शोधतात आणि त्याचे धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. अनेकदा हे विषारी प्राणी माणसांच्या घरात घुसतात आणि तेथेच आश्रय घेतात. वेळीच लक्षात नाही आले तर त्या घरातील कुणाचा तरी जीव निश्चितपणे हे घेत असतात. साप, नागासारखे विषारी प्राणी कधी घरात तर कधी दारात लावलेल्या वाहनात आश्रय घेतात. कधी कधी तर हे प्राणी बाहेर सोडलेल्या बुटात लपलेले असतात. घाईघाईने बूट घालायला गेले की त्याचा दंश ठरलेला असतो. दारात उभ्या केलेल्या दुचाकी दुर्लक्षित असतात. सकाळी जेंव्हा कामासाठी घाईघाईने बाहेर पडू लागतो तेंव्हा कुणी दुचाकीची तपासणीही करीत नाही. आणि दुचाकीत आश्रय घेतलेला नाग लक्षातही येत नाही त्यामुळे अनर्थ अटळ असतो. अशा कितीतरी घटना आजवर घडलेल्या आहेत तरीही कुणी सावधपणे गाडीकडे पहात नाही. 


विश्वास बसणार नाही अशा ठिकाणी हा मृत्यू  दडून बसलेला असतो हे व्हायरल झालेल्या अनेक धक्कादायक व्हिडीओमधून पहायला मिळत असते. अलीकडे साप, नागांचे असे व्हिडीओ समाज माध्यमांवर हमखास पाहायला मिळतात. हे व्हिडीओ पाहूनही अंगावर काटा उभा राहतो. मृत्यू कसा कुठेही येऊन थांबलेला असतो हेच या व्हिडीओमधून दिसत असते. असाच  आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो पाहताना क्षणभर श्वास कोंडला जातोय ! दारात उभ्या असलेल्या स्कुटीच्या हॅंडलमध्ये जाऊन एक किंग कोब्रा लोळत पडलेला आहे पण त्याचे आस्तित्वही जाणवत नाही. किती मोठे संकट कशाप्रकारे दडून बसलेले आहे हे मात्र नंतर सर्वानाच पाहायला मिळाले आहे. लपून बसलेल्या या किंग कोब्राला बाहेर काढण्यात यश आले आणि सुदैवाने कुणाला काही धोका झाला नाही. 


सुटीच्या हॅण्डलमध्ये घुसलेल्या किंग कोब्राची जाणीव एकाला झाली त्यामुळे तातडीने सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. दुचाकीच्या जवळ जाऊन पहिले तरी हा किंग कोब्रा जरासाही दिसत नाही. सर्पमित्राने मात्र कौशल्याने हॅण्डल कव्हर बाजूला करताच किंग कोब्रा आक्रमकपणे बाहेर येत आहे. त्याला पाहून प्रत्येकाचा श्वास गुदमरतो आणि अंगावर काटा आणतो. (A poisonous king cobra rested in the handle of the scooty: Viral video) सर्पमित्राने त्याला कुशलतेने पकडून दूर जंगलात सोडून दिले खरे पण या किंग कोब्राचे आस्तित्व जाणवले नसते तर काय झाले असते याची कल्पनाही कुणाला करवत नाही. तुम्हीच पहा या किंग कोब्राचा संपूर्ण थरार ! व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लाईवर टच करा !   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !