BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ ऑक्टो, २०२२

भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार, पाच जखमी !

 



शोध न्यूज : नारायणपूर येथे बालाजी दर्शनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला अत्यंत भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन तरुण विद्यार्थी ठार झाले आहेत तर तीन मुलीसह पाच जखमी आहेत. 


पुण्याच्या एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेणारे पाच विद्यार्थी विद्यार्थिनी नारायणपूर येथे बालाजी दर्शनासाठी निघाले होते. अत्यंत वेगात निघालेल्या चार चाकी गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सासवडजवळ हा अपघात झाला. वेगातील या गाडीने चारवेळा पलटी मारली आणि गाडीतील पाच पैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील तीन मुली या जखमी झाल्या आहेत. गौरव ललवाणी (वय 19) आणि रचित मोहता (वय 18) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे असून जखमी पाच जखमीवर ससून रुगणालयात उपचार सुरु करण्यात आलेले आहेत. 


सासवड - कापूरहोळ दरम्यान दत्त मंदिराच्या जवळ असलेल्या अत्यंत धोकादायक वळणावर हा अपघात झाला. गाडी वेगात असल्याने आणि धोकादायक वळण असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि गाडी उलटी पलटी होत गेली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांना देखील या गाडीने धडक देत चार पलट्या घेतल्या. या अपघातात गाडीचा तर अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिक देखील धावत आले आणि त्यांनी जखमींना मदत केली.  


राज्याच्या विविध भागातून आणि विविध राज्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी एमआयटी महाविद्यालयात येत असतात. यातील काही विद्यार्थ्यांनी बालाजी दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला पण गाडीवरील वेगावर मात्र नियंत्रण ठेवले नाही. (Two students were killed in a horrific accident) अतिवेगामुळे धोकादायक वळणावर हा अपघात झाला आणि दोन तरुण विद्यार्थ्यांचा या अपघातात बळी गेला आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर या अपघाताने शोककळा पसरली आहे. या अपघातात पाच जखमी असून यात तीन मुलींचा समावेश आहे. त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !