BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२३

आमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला लागला मार !

 




शोध न्यूज : नेत्यांच्या अपघाताचे सत्रच सुरु झाले असून नुकताच शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांचा अपघात झाला आणि  आज आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.


आमदार विनायक मेटे यांच्या अपघातानंतर नेत्यांच्या अपघाताची एक मालिकाच  सुरु आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे आणि त्यानंतर शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांचा नुकताच अपघात झाला आहे. या अपघाताबाबत त्यांनी घातपात असण्याचीही शक्यता व्यक्त केली होती. या अपघाताची चर्चा सुरु असतानाच आज आमदार बच्चू कडून यांच्या अपघाताची बातमी आली आहे रस्ता क्रॉस करताना त्यांना दुचाकीने धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात होताच आमदार बच्चू कडू यांना तातडीने अमरावती येथील रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे.


आज बुधवारी सकाळी आ. बच्चू कडू हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीने त्यांना धडक दिली. दुचाकी अत्यंत वेगात असल्यामुळे त्यांना अत्यंत जोराची धडक बसली आणि आ. कडू हे रस्ता दुभाजकाच्या दिशेने जोरात फेकले गेले. दूर जाऊन पडताना त्यांच्या डोक्याला देखील मार लागला.  या अपघातात आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. (Ex-minister, MLA Bachu Kadu, accident, hit his head) दरम्यान आपली प्रकृती ठीक असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !