BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ ऑक्टो, २०२२

भीषण अपघात : पाच भाविकांचा मृत्यू, दहा जखमी !

 


शोध न्यूज : नवरात्रीनिमित्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला आणखी एक अपघात झाला असून या अपघातात पाच भाविक जागीच ठार तर दहा जण जखमी झाले आहेत.

वरात्री सुरु होण्याच्या आदल्या दिवसापासून तुळजापूर मार्गावर सतत अपघात होत असून यात भाविकांचे मृत्यू होत आहेत आणि आज तर अत्यंत भीषण असा अपघात झाला आहे. तुळजापूर रस्त्यावर भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेलाच होता परंतु याकडे कुणीच गंभीरपणे पाहिले नाही आज मोठा अपघात पाहण्याची वेळ आली आहे. नवरात्री आणि दसरा या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेत असतात. यावेळी मात्र तुळजापूर रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरु असून आज मात्र अगदीच भीषण अपघात झाला आणि तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा या अपघातात मृत्यू झाला आहे.


तुळजापूर येथे दर्शन घेवून आपल्या कारमधून (एम एच २४ एबी ०४०८ )परत निघालेल्या भाविकांना लातूर- उदगीर मार्गावर हैबतापूर पेट्रोल पंपाच्या जवळ काळाने गाठले. आडवे आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात कारमधील अलोक तानाजी खेडकरकोमल व्यंकट कोदरेअमोल जीवनराव देवकतेयशोमती देशमुख व चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर हे पाच जण ठार झाले आहेत.कारमधील प्रियांका गजानन बनसोडे ही महिला गंभीर जखमी असून मृत आणि जखमी हे उदगीर येथील रहिवाशी आहेत. मृत्युमुखी पडलेले पाच जण हे उदगीर येथील एका खाजगी रुग्णालयात काम करीत होते. 


राज्य परिवहन महामंडळाची बस आणि भाविकांची कार यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला. उदगीर आगाराची बस ही चाकुरकडे निघाली होती. ही बस भाविकांच्या कारला धडकली. या अपघातात एकूण दहा जण जखमी झाले आहेत अशी माहितीही मिळत आहे. भरधाव वेगाने कार निघालेली असताना अचानक एक कुत्रा आडवा आला आणि त्याला चुकविण्यासाठी चालकाने एकदम गाडी बाजूला वळवली. याच दरम्यान समोरून राज्य परिवहन महामंडळाची बस येत होती. सदर कार या बसवर जाऊन समोरच्या बाजूने आदळली आणि हा भीषण अपघात घडला. या अपघातात कारचा तर अक्षरश: चक्काचूर झाला आहे. काडी पेटी मोडून पडावी अशी अवस्था कारची झाली आहे.  


सोलापूर- तुळजापूर मार्गावर देखील सलग दोन अपघात नुकतेच झाले असून यात एका महाविद्यालयीन तरुणाचा तसेच दुसऱ्या एका अपघातात सोलापूर येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. (Accidental death of five devotees who left Tuljapur for darshan) या घटनामुळे भाविकत चिंता व्यक्त होत असताना आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना आजचा हा भीषण अपघात घडला आणि पाच भाविकांचे प्राण गेले आहेत.


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !