BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२३

राष्ट्रवादीच्या खासदारांना प्राणघातक हल्ला प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा !

 


शोध न्यूज : राष्ट्रवादीचे खासदार आणि शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या मोहम्मद फैजल यांना खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 


गेल्या वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते सतत अडचणीत येताना दिसत असून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना नुकताच जामीन मिळाला आहे. राष्टवादीचे दुसरे एक मोठे नेते नवाब मलिक हे अद्यापही तुरुंगात असून त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही तोच आणखी एक नेते हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल याला तब्बल दहा वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. फैजल हे राष्टवादीचे प्रमुख शरद पवार यांचे निकटचे सहकारी मानले जातात. फैजल हे लक्षद्वीप चे खासदार असून त्यांना एका हल्ला प्रकरणात ही मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१४  पासून मोहम्मद फैजल हे संसदेत  केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २००९ च्या एका हल्ल्याच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांच्यासह अन्य तीन दोषींचा जामीन न्यायालयाने रद्द केला आहे. 

 
खासदार मोहम्मद फैजल यांनी त्यांचेच नातेवाईक मोहम्मद सालीह यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपात त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून या प्रकरणात एकूण २३ आरोपी होते परंतु त्यातील ४ आरोपींना दोषी धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दहा वर्षांच्या सश्रम मजुरीसह प्रत्येकी एक लाख रुपये दंड देखील सुनावण्यात आला आहे. हल्ला झालेले मोहम्मद सलीह हे लक्षद्वीपचे दिवंगत माजी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीएम सईद यांचे जावई आहेत. (Attempt to murder, MPs of Nationalist Congress Party sentenced to ten years)  एका शेडच्या बांधकामावरून झालेल्या वादानंतर सलीह हे गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना केरळला नेण्यात आले होते. तेथील रुग्णालयात  त्यांच्यावर अनेक महिने रुग्णालयात उपचार करण्यात आले.  राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरण असून वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे फैजल यांनी म्हटले आहे.


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  
 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !