BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२३

छळाला कंटाळून विवाहित तरुणीची आत्महत्या !

 


शोध न्यूज :चारित्र्याच्या संशयावरून होत असलेला छळ असह्य झाल्याने पंढरपूर तालुक्यातील एका तरुण विवाहितेने गळफास घेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला असून याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महिलांना कायद्याने मोठे सरंक्षण दिले असताना आणि महिलांविषयक अनेक सशक्त कायदे असतानाही विवाहितांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. कुठल्या ना कुठल्या कारणाने विवाहित महिलांचा छळ होण्याच्या घटना आजही सुरूच आहेत. हुंड्यासाठी, पैशासाठी. अपत्य होत नाही म्हणून अथवा मुलगा होत नाही म्हणून आणि चारित्र्याच्या संशयावरून महिलांचा छळ आज एकविसाव्या शतकात देखील सुरु असल्याच्या घटना सतत समोर येत असतात. सुशिक्षित, अशिक्षित अथवा गरीब, श्रीमंत असा कसलाही भेदभाव अशा घटनातून दिसून येत नाही. असाच एक प्रकार पंढरपूर तालुक्यातील चळे येथे घडल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. 


चारित्र्याचा संशय घेवून आणि घरात राहायचे नाही यावरून छळ झाल्याने चळे येथील २१ वर्षीय तरुण विवाहिता आरती नवनाथ शिखरे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारित्र्याचा संशय घेवून आरतीचा शारीरिक, मानसिक छळ होत होता, तिला 'आमच्या घरात राहायचे नाही' असे सांगितले जात होते. या सर्व प्रकारास कंटाळून आरतीने रविवारी पहाटेच्या सुमारास साडीच्या सहाय्याने राहत्या घरातच गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणी कासेगाव रोड, पंढरपूर येथील आशा बालाजी कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


विवाहित तरुणी आरती नवनाथ शिखरे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आरतीचा पती नवनाथ शिखरे, सासू जनाबाई शिखरे, दीर धनाजी शिखरे आणि त्याची पत्नी उज्वला धनाजी शिखरे या चौघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (A married young woman commits suicide in Pandharpur taluka due to harassment) या घटनेने ग्रामीण भागात आणि चळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेची चर्चा केली जात आहे.  या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर हे अधिक तपास करीत आहेत.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !