BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२३

दहा वर्षाच्या शाळकरी मुलीला टिपरने चिरडले ! कुटुंबाचा आक्रोश !


 शोध न्यूज : एस टी ची वाट पहात उभ्या असलेल्या एका दहा वर्षे वयाच्या शाळकरी मुलीला एक टिपरने चिरडले असून त्यात या मुलीचा मृत्यू झाला आहे, ही घटना पाहून कुटुंबीयांनी रस्त्यावरच आक्रोश केला. काळीज भेदणारा आक्रोश एकूण प्रत्येकाचे मन हेलावून जात होते.


"नरक"वास !!

✪🅾 दुर्गंधीचा सहावा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ टाकळी उपनगरात तुंबलेल्या गटारीने प्रचंड दुर्गंधी, "नरक वासा" चा अनुभव ... डासांचे साम्राज्य ! नागरी आरोग्याचा खेळखंडोबा ! ✪


अपघात आणि माणसांचे मरणे हे भलतेच सामान्य होऊन बसले असून भरधाव वेगापुढे सामान्य माणसांच्या प्राणाची किंमत उरली नसल्याचेच दिसून येत आहे. वाढत्या अपघाताने चिंता व्यक्त होत असली तरी अपघाताचे प्रमाण जराही कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीतच आज मंगळवेढा तालुक्यात एका दहा वर्षे वयाच्या शाळकरी मुलीला एक भरधाव वेगातील टिपरने चिरडून मारले असून प्रचंड हळहळ तर व्यक्त होताच आहे पण बेभान वाहनचालकांच्या विरोधात संताप उफाळून आला आहे. टिपरने चिरडल्यामुळे या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.


मंगळवेढा - विजापूर रस्त्यावरील बालाजीनगर फाटा येथे आज ही दुर्घटना घडली आहे. शिवन्या संतोष पवार ही दहा वर्षाची शाळकरी मुलगी आणि तिची आई दवाखान्यासाठी मंगळवेढ्याला निघालेले होते. त्यासाठी बालाजीनगर फाटा येथे एस टी ची वाट पाहत मायलेकरं उभी होती. याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एका टिपरने या मुलीला चिरडले. टिपरची जोरदार धडक लागल्याने शिवन्या ही मुलगी जागीच ठार झाली. ही घटना घडली तेंव्हा परिसरातील लोक धावून आले पण शिवण्याचा जागीच मृत्यू झाला होता. आपल्या मुलीचा मृतदेह पाहून तिच्या आईने जोराचा हंबरडा फोडला. कित्येक वेळ या ठिकाणी फक्त आक्रोश ऐकू येत राहिला आणि तो ऐकणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत राहिला. 


या मुलीचे वडील एका कारखान्यात काम करतात. या लहान मुलीच्या अपघाताने बालाजीनगर गावात शोककळा पसरली असून बेदरकार वाहनचालकांच्या विरोधात संताप व्यक्त होऊ लागला आहे. (Mangalvedha accident: Ten-year-old girl killed) कर्नाटक राज्यातील अनेक वाहने अवैध वाहतूक करीत मंगळवेढा तालुक्यातून वेगाने धावत असतात. त्यातून अशी वाहने निष्पाप लोकांचे बळी घेत असतात. आजच्या या घटनेने तर अनेकांचे काळीज पिळवटून गेले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !