BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जाने, २०२३

कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू !

शोध न्यूज : कर्तव्यावर असलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून पोलीस दलात या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


"नरक"वास !! ✪🅾 दुर्गंधीचा 7 वा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ टाकळी उपनगरात तुंबलेल्या गटारीने प्रचंड दुर्गंधी, "नरक वासा" चा अनुभव ... दिलासा नाहीच ! ✪


पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण सतत असतो, पोलिसांची मर्यादित संख्या आणि वाढती गुन्हेगारी यामुळे पोलिसांना उसंत मिळत नाही शिवाय कौटुंबिक जबाबदारीचे ओझे घेवून पोलीस दिवसरात्र कष्ट करीत असतो. कामाच्या ताणतणावात पोलिसांचे आरोग्याकडेही दुर्लक्ष होत जाते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Tragic incident Death of Solapur rural police officer on duty) काल रविवारी ही दु:खद घटना घडली. ५५ वर्षे वयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबलू नाईकवाडी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि  पोलीस दल हळहळले. 


किरकोळ वादाचे एक प्रकरण मिटविण्यासाठी ते कामती पोलीस ठाण्यातून हद्दीतील कुरूल येथे पोहोचले. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि दम लागून घाम येऊ लागला. त्यामुळे स्वत:च कार चालवत ते कामती येथे आले. त्यांनी मेडिकल दुकानातून औषध घेतले आणि कामती गावातून जात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हा झटका एवढा तीव्र होता की गाडीतच त्यांचा मृत्यूही झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यावर सहकारी पोलिसांनी त्यांना कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोलापूर येथे राहणारे पोलीस उपनिरीक्षक बबलू नाईकवाडी हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने अनेकांशी त्यांचे प्रेमळ संबंध होते. त्यांच्या अशा प्रकारच्या निधनाने त्यांच्या सहकाऱ्याना देखील धक्का बसला असून सोलापूर पोलीस दलात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !