BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जाने, २०२३

राष्ट्रवादीचे जखमी नेते धनंजय मुंडे यांना मुंबईला हलवले !

 


शोध न्यूज : राष्ट्रवादीचे जखमी नेते धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी विमानाने मुंबईला हलविण्यात आले असून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. मध्यरात्री त्यांचा बीड जिल्ह्यात मोठा अपघात झाला होता. 


मध्यरात्री अपघात झाला असतानाही या अपघाताची माहिती सकाळपर्यंत कोणाला नव्हती. सकाळी ही बातमी पसरली तेंव्हा कार्यकर्त्यांनी मुंडे यांची विचारपूस करण्यासाठी धाव घेतली. त्यांची अपघातग्रस्त गाडी झाकून ठेवण्यात आली आहे परंतु गाडीची अवस्था पाहता हा अपघात साधासुधा नसल्याची कल्पना येते. आपली प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखे काही नाही असे स्वत: धनंजय मुंडे यांनीच सांगितले असले तरी त्यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागलेला आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असून त्यासाठीच त्यांना आज मुंबईला हलविण्यात आले असून ब्रीच कँडी रुग्णालयात ते उपचार घेणार आहेत. लातूर येथून एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आल्याने ते दुपारीच लातूरकडे निघाले. (Injured NCP leader Dhananjay Munde was shifted to Mumbai) यावेळी डोक्याला गमजा, अंगावर शाल पांघरली होती. जखमी अवस्थेतील मुंडे यांना पाहण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 


अपघातात किरकोळ मार लागला असून अधिक काळजीची गरज नसल्याचे मुंडे सांगत असले तरी आता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या तपासण्या झाल्यावर तेथील डॉक्टर नेमके काय सांगतात याकडेच राष्टवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. राष्टवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील मुंडे यांना भेताण्यासाठी रुग्णालयात जाणार आहेत. या अपघातानंतर कार्यकर्ते काळजीत असून ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर काय माहिती देतात याकडेच लक्ष लागलेले आहे. मुंडे हे रुग्णवाहिकेतून लातूरकडे निघण्यासाठी बाहेर आले तेंव्हा त्यांच्या डोक्यालाही बांधण्यात आलेले होते. त्यांच्या कपाळावरील भाग उघडा राहणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसत होते. यावेळी प्रसारमाध्यमांची गर्दी होऊ लागल्याचे दिसताच मुंडे हे घाईघाईने रुग्णवाहिकेत गेले आणि मुंबईकडे जाण्यासाठी लातूरच्या दिशेने रवाना झाले.



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !