BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जाने, २०२३

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात !

 


राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या बाबतील अपघाताच्या घटना घडताना समोर येत आहे. आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताने महाराष्ट्र हादरला असतानाच नुकताच भाजपचे आमदार गोरे यांच्या गाडीलाही मोठा अपघात झाला. अनेक नेत्यांच्या वाहनांना किरकोळ स्वरूपाचेही अपघात झाले आहेत आणि आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला मध्यरात्री अपघात झाला असून कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. मुंडे हे किरकोळ जखमी झाले असून काळजीचे कारण नसल्याची माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनीच दिली आहे. परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी त्यांच्या कारला अपघात झाला असून यावेळी मुंडे हे स्वत:च कार चालवत होते. दिवसभराचे कार्यक्रम आटोपून ते मध्यरात्री परळीकडे निघालेले होते त्यावेळी त्यांचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाला आहे.


या अपघातात धनंजय  मुंडे यांना किरकोळ मार लागला असून आपल्या प्रकृतीची काळजी करण्यासारखे काही नसल्याचे त्यांनी स्वत:च सांगितले आहे. धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले परंतु  त्यांच्या छातीला मार लागला असून पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. (NCP leader Dhananjay Munde's car met with an accident in the midnight) त्यांच्या या अपघाताबाबत सकाळपर्यंत कुणालाच माहिती नव्हती परंतु सकाळपासून ही बातमी बाहेर येऊ लागली आणि नंतर या घटनेची सर्वत्र माहिती झाली. त्यांच्या अपघातामुळे राष्ट्रवादीत आणि त्यांच्या कार्यकर्त्यात मात्र अस्वस्थता पसरली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !