BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जाने, २०२३

चार महिलांचा जीव घेणारा युसुफ दोन दिवस दडला होता ज्वारीत !

खेळ आरोग्याचा !

✪🅾 दुर्गंधीचा आरंभ ! 🅾 ✪ 🅾️ लक्ष्मीटाकळी उपनगरात पुन्हा तुंबली गटार ! ३२ दिवस तुडूंब असलेली गटार उपसली, दोन दिवसात पुन्हा जैसे थे ! ... ✪

 



शोध न्यूज : चार कामगार महिलांचे बळी घेणारा युसुफ पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी तब्बल दोन दिवस ज्वारीच्या पिकात दडून बसला होता पण त्याची माहिती मिळाली आणि युसुफ मणियारला बेड्या ठोकण्यात आल्या.

 
बार्शी तालुक्यातील पांगरी, शिराळे गावाच्या परिसरात असलेल्या इंडियन फायर वर्क्स फॅक्टरीत स्फोट झाला, प्रचंड आग लागली आणि यात चार गरीब आणि कामगार महिला होरपळून मृत्युमुखी पडल्या. या घटनेची चिंता आणि संताप व्यक्त होत असतानाच हा कारखाना विनापरवाना चालत असल्याची मोठी आणि धक्कादायक बाब समोर आली आणि घटनेने वेगळेच वळण घेतले. परवाना नसताना रस्त्याच्या बाजूला असा धोकादायक कारखाना एवढे वर्ष चालत असताना प्रशासनाला कसा पत्ता लागला नाही ? प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली काय ? असे काही सवाल विचारले जाऊ लागले आहेत. दरम्यान या प्रकरणी कारखान्याचा मालक युसुफ मणियार (पांगरी, ता. बार्शी) आणि त्याचा उस्मानाबाद येथील भागीदार नाना पाटेकर या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 


दरम्यान घटना घडल्यापासून पोलीस मालक युसुफ मणियार याच्या शोधात होते पण त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यानंतर गुन्हा दाखल झाला पण युसुफ बेपत्ताच होता. पोलीस चौकशी करीत होते पण युसुफही बेपत्ता होता आणि त्याचे कुटुंब देखील गायब झालेले होते. युसुफ आणि नाना पाटेकर यांना पकडण्यासाठी पोलिसाची पथके तयार करण्यात आली होती आणि ही पथके लगेच वेगवेगळ्या दिशेने आरोपींच्या तपासासाठी रवाना झाली होती. एवढी मोठी घटना घडल्यामुळे आरोपी दूरवर पसार झाले असतील असे वाटत होते पण फटाका कारखान्याचा मालक युसुफ मणियार याने दूर कुठे जाण्याऐवजी जवळच असलेल्या शिराळे शिवारातील ज्वारीच्या पिकात आश्रय घेतला होता. 


पोलीस पथके आरोपींचा शोध घेत फिरत होते आणि मुख्य आरोपी युसुफ मणियार हा तेथेच दोन दिवस ज्वारीच्या शेतात दडून बसला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी अत्यंत कौशल्याने त्याला ज्वारीच्या पिकात जेरबंद केले. पोलिसांनी ज्वारीच्या त्या शेताला चोहोबाजूने घेरले आणि पुढे पुढे सरकत पिकात लपून बसलेल्या या युसुफला जेरबंद केले. त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चार पोलीस पथके आरोपींचा शोध घेत फिरत होते आणि युसुफ मात्र गाव सोडून गेलाच नव्हता. घर सोडून शिवारात जाऊन दोन दिवस त्याने ज्वारीच्या पिकाचा आश्रय घेतला होता. अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केला. 


युसुफ मणियार याचा भागीदार असलेला उस्मानाबाद येथील नाना पाटेकर हा मात्र अजूनही फरार असून पोलिसांच्या पथकाला तो अद्याप सापडला नाही. पोलिसांनी चौकशी सुरु केली असता तो एकटाच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंबच बेपत्ता झाले आहे. (Barshi firecracker factory blast, Absconding owner in crop for two days) पोलीस या नानालाही लवकरच जेरबंद करतील आणि तसा पोलिसांचा कसून प्रयत्न सुरु आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !