BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२३

'तूला खल्लास करतो' म्हणत माजी नगरसेवकाचा तरुणावर हल्ला !

 



शोध न्यूज : एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी माजी नगरसेवक गोत्यात आले असून मारहाण प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक प्रताप गंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
>

"नरक"वास !! ✪🅾 दुर्गंधीचा 8 वा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ टाकळी उपनगरात "नरक वासा" चा छळवाद सुरूच ! ... संबंधिताला खबरच नाही ? कुणाच्या 'सौजन्याने ? ✪

पंढरपूर आणि दादागिरी या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकीकडे पंढरीला अध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखले जाते. थोर साधुसंतांनी पंढरी नगरी पवित्र केली आहे पण गुंड, गुन्हेगारांनी या नगरीला अपवित्र केले आहे. भरदिवसा नंग्या तलवारी नाचवत पंढरीच्या रस्यावर अनेक मुद्दे पडले आहेत. जेथे टाळ मृदंगाचा निनाद आणि हरीनामानाचा जयघोष ऐकायला मिळतो तेथेच तलवारीचा खणखणाटही ऐकायला मिळत होता. पंढरीतील गुंडगिरी आणि गुन्हेगारी देशात कुप्रसिद्ध झाली होती. सुदैवाने गेल्या काही वर्षात पोलिसांनी ही गुन्हेगारी मोडून काढली आहे पण तरीही काही प्रमाणात का होईना अजूनही काही गुंड पंढरीत सक्रीय असल्याचे अधूनमधून दिसून येते. 

पंढरीत एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याच्या प्रकरणी माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्षा यांचे पती प्रताप गंगेकर यांच्या विरोधात पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.  एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद त्यांच्याविरोधात दाखल झाली आहे. या माजी नगरसेवकाच्या विरोधात यापूर्वीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसात दाखल झालेले आहेत.  माजी नगरसेवक प्रताप गंगेकर यांनी प्रशांत आप्पा चौरे यांना दारूच्या नशेत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. प्रशांत चौरे हे आपल्या मित्रासोबत म्हसोबा मंदिराच्या जवळ थांबलेले असताना माजी नगरसेवक प्रशांत गंगेकर आणि सागर लऊळकर त्या ठिकाणी आले. मागील घटनेचा राग धरून त्यांनी प्रशांत याला शिवीगाळ सुरु केली. 

प्रशांत चौरे यांना शिवीगाळ करण्यावर हे प्रकरण थांबले नाही तर माजी नगरसेवक प्रताप गंगेकर यांनी अचाकन त्यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत चौरे हे जखमी झाले. प्रशांत याला पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अचानक गंगेकर आणि त्याचा सहकारी येवून मारहाण करू लागला तेंव्हा, कशासाठी मारहाण करीत आहात ? असा सवाल प्रशांत याने विचारला असता, 'मस्ती आलीय तुम्हाला, तुला खल्लास करतो असे म्हणत   लाकडाने मारहाण सुरु केली. (A former corporator attacked a youth with wood in Pandharpur city) यावेळी माझी बहिण सोडविण्यास आली असता तिलाही ढकलून देण्यात आले आणि मारहाण करण्यात आली असे जखमी प्रशांत चौरे या तरुणाने सांगितले.



            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !