BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२३

चलनी नोटेवर काही खरडले असेल तर नोट बाद होते ? सत्य आले समोर !


"नरक"वास !! ✪🅾 दुर्गंधीचा 8 वा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ टाकळी उपनगरात "नरक वासा" चा छळवाद सुरूच ! ... संबंधिताला ना फिकीर ना नागरिकांची चिंता ! नागरिक हैराण पण --- ! ✪

शोध न्यूज : भारतीय चलनी नोटेवर जर काही खरडले, लिहिले असले तर ही नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा मेसेज व्हायरल होत असून या दाव्याची सत्यता पडताळण्यात आली आहे. 


चलनी नोटा खराब होऊ नयेत म्हणून नोटाचे बंडल स्टेपल केले जात नाही परंतु अनेक नागरिक भारतीय चाळणी नोटा कशाही हाताळतात आणि त्या खराब होतात. अनेकदा दुकानदार अशा नोटा स्वीकारायला तयार होत नसतात आणि यामुळे बराच गोंधळ उडतो. नोटाना रंग लागतो तसेच अनेकजण नोटांवर काहीही लिहित असतात, रकमेचे आकडे टाकत असतात त्यामुळे चलनी नोटा खराब होतात. अशा नोटा घेण्यास दुकानदार नकार देतात आणि या नोटा चालत नाहीत असे सांगितले जाते. खिशात ठेवलेली नोट विविध कारणामुळेही खराब होते आणि कित्येकदा दुकानदार अशा नोटा स्वीकारण्यास नकार देत असतात त्यामुळे पैसे असूनही सामान्य ग्राहकाला काही खरेदी करता येत नाही.


अशाच परिस्थितीत अशा नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा एक मेसेज व्हायरल झाल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. हा मेसेज रिझर्व बँकेच्या नावाने व्हायरल करण्यात आला असून त्यानुसार कोणत्याही नवीन नोटेवर असे काही लिहिलेले आढळल्यास ती नोटच रद्द करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या नोटेचे कोणतेच बाजार मूल्य नसेल. तो एक केवळ कागदाचा तुकडा होईल.असे भासविण्यात आले आहे. आधीच थोडीसी खराब झालेली नोट काही व्यापारी नाकातात आणि सामान्य नागरिकांची कोंडी होत असते. त्यात अशा प्रकारचा मेसेज आल्याने सामन्यात घबराट आणि संभ्रम निर्माण झालेला दिसून येत होता. 


या मेसेजमुळे सामान्य नागरिकात आणि व्यापारी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक असून रिझर्व बँक ऑफ इंडियाने या विषयी मार्गदर्शक तत्चे जारी केली असल्याचा दावा देखील केला गेला आहे. अलीकडे विविध मेसेज व्हायरल होतात आणि यातील अनेक मेसेज हे खोटे आणि  दिशाभूल करणारे असतात. असे संदेश अथवा व्हिडीओ यांची शासनाच्या पीआयबीकडून अर्थात पत्र सूचना कार्यालयाकडून पडताळणी केली जात असते. चलनी नोटांच्या बाबतीत व्हायरल होत असलेल्या मेसेजची देखील या विभागाकडून पडताळणी करण्यात आली असून रिझर्व बँकेकडून अशी कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पीआयबीने पडताळणी केल्यानंतर हा मेसेज केवळ भ्रामक असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये तसेच या मेसेजाकडे पूर्ण दुर्लक्ष करावे असे आवाहन करण्यात आले आहे.   


पीआयबी च्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली असून  हा मॅसेज खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय बँकेने अशा प्रकारे कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. खराब, फाटक्या नोटा बँकेतून बदलवून मिळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पडताळणीनंतर अनेकांना दिलासा मिळाला असून मेसेजने मात्र अनेकांना धक्का दिला होता. व्यवहारात चलनी नोटा येत असतात, त्यातील काही नोटांवर आकडेमोड, काहीतरी संदेश, कोणाचे तरी नाव, पत्ता अशा बाबी लिहिल्या असतात. (Defaced currency notes de-circulated, viral message fake)  अशा नोटा चलनातून बाद होण्याच्या संदर्भात मेसेज आल्याने अनेकांनी आपल्या खिशातील नोटा तपासून पहिल्या होत्या. अशा नोटांबाबत मोठा गैरसमज पसरला गेला होता परंतु हा मेसेज खोटा असल्याची बाब पुढे आली आहे त्यामुळे आता अशा नोटा चलनात आल्या तरी घाबरण्याचे कारण उरले नाही.



  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !