BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२३

मुख्यमंत्री शिंदे यांची "ती" क्लिप आपल्याकडे असल्याचा आमदारांचा दावा !



शोध न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ती ऑडीओ क्लिप आपल्याकडे असून ती आपण सार्वजनिक करणार असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केल्याने पुन्हा एकदा राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


"नरक"वास !! ✪🅾 दुर्गंधीचा 8 वा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ टाकळी उपनगरात "नरक वासा" चा छळवाद सुरूच ! ...कुणाच्या 'सौजन्याने ? ✪


ठाकरे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून चाळीस आमदारांसह ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि हे आमदार सूरतमार्गाने गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्यांच्यातून बाहेर पडून आमदार नितीन देशमुख हे परत आले होते. आपण मोठ्या परिश्रमाने या चाळीस आमदारांच्या गटातून सुटका करून घेतली असल्याच्या कहाण्या देखील त्यांनी सांगितल्या होत्या. कशा प्रकारे आपल्याला शिंदे गटाने गुवाहाटीला चालवले होते आणि त्यांच्यातून आपण कसे पळून आलो आहोत याची सविस्तर माहिती आ. देशमुख यांनी पत्रकारांना दिली होती. हे एकूण प्रकरण शिवसेना फुटीच्या वेळी भलतेच गाजले होते आणि त्याची चर्चाही तशीच झाली होती. आता मात्र आ. देशमुख यांना 'टार्गेट' केले जाऊ लागल्याचा आरोप होऊ लागला असून त्यांना त्रास दिला जात असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. 


आ. देशमुख यांना लाचलुचपत खात्याने एक नोटीस दिली असून त्यांच्या कथित बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारीला त्यांना अमरावती येथील एसीबी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. त्यानंतर मात्र आ. देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप केला आहे. लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्याचे आणि मुख्यमंत्र्यांचे फोनवर झालेल्या संभाषणाची एक ऑडीओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खोट्या प्रकरणात आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला असून भावना गवळी यांच्या तक्रारीवरून आपल्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकवले जात आहे. आपल्याविरुद्ध तक्रार करणारी व्यक्ती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या फोनच्या संभाषणाची ऑडीओ क्लिप आपल्याकडे असून तक्रारदाराची ओळख पटल्यानंतर पुरावेच सादर करणार असल्याचे आ. नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरील संभाषणात तोच तक्रारदार आहे का याची खातरजमा झाल्यानंतर ती ऑडिओ क्लिप माध्यमांकडे उघड करणार आहे आणि १७ जानेवारीस एक पत्रकार परिषद घेऊन सगळे सत्य उघडकीला आणणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आधीही ठाकरे गटातील आमदारांना नोटीसा दिलेल्या आहेत. ठाकरे गटातील वैभव नाईक, राजन साळवी यांच्यानंतर आ. देशमुख हे नोटीस येणारे तिसरे आमदार आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार देशमुख यांच्यावर आधीही काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत देशमुख यांनीच माहिती दिली आहे.  काही दिवसांपूर्वी खासदार भावना गवळी यांनी माझ्यावर अश्लील चाळे केल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळेस पहिली नोटीस आली होती.  नागपूर येथील  हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याचा, कलम ३५३ नुसार माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोटीस आली आहे असे आ. देशमुख यांनी सांगितले. (Audio clip of Chief Minister Eknath Shinde will be made public)आपल्याजवळ कसलीही बेहिशोबी मालमत्ता नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री आणि तक्रारदार यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडीओ क्लिप आपल्याकडे असून ती सार्वजनिक करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने मात्र राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !