शोध न्यूज : बार्शी येथील आगीचे अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागले असतानाच आज सोलापुरात आगीचे मोठे तांडव पहायाला मिळाले असून रेडीमेड कपडे आणि शिलाई मशीन कारखान्यास आज मोठी आग लागली.
बार्शी तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका फटाका कारखान्यास लागलेल्या आगीचे अंत्यत भयानक परिणाम महाराष्ट्राने पहिले आहेत तोच सोलापूर शहरात आज आगीचे तांडव पाहण्याची वेळी आली. सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरातील दत्त नगर येथे पाच रेडीमेड कपडे आणि शिलाई मशीन कारखान्यास अचानक आणि भयानक आग लागली. गड्डम, चिकल्ल, तारा यासोबतच पाच ते सहा कारखाने व गणपती तयार करण्याचे गोडाऊनला ही आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट आकाशाच्या दिशेने झेपावत असल्याचे अत्यंत भयावह चित्र पाहून अनेकांना हादरा बसला. (Fire in Solapur city, five factories burnt down)आगीची तीव्रता अधिक असल्याने सहजासहजी ती विझवता येण्यासारखी नव्हती. अग्निशामक दलाच्या गाड्या वेगाने येथे पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
आग भडकत असताना स्थानिक नागरिकांनी देखील ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दल यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले पण तोपर्यत बरेच काही खाक झाले होते. सुरुवातीला एका कारखान्याला ही आग लागली पण ही आग पसरत गेली आणि इतर कारखाने देखील आगीच्या लपेटयात आले. त्यामुळे लाखो रुपयांचा माल जाळून खाक झाला असून हे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. नागरी वस्तीत ही आग लागली असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु अग्निशामक दलाने या आगीला अधिक पसरू दिले नाही. दोन कारखान्यांचे अधिक नुकसान झाले असून ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या वेळेत दाखल झाल्या त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !