अध्यात्मिक गुरु म्हणून आसारामने देशभर लौकिक मिळवला होता आणि लाखो करोडो भक्त जमा केले होते. अनेक वर्षे राज्य केल्यावर त्याचे एकेक भांडे फुटत गेले आणि भक्ताच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा कथित अध्यात्मिक गुरु तुरुंगात जाऊन बसला आहे. आसाराम बापू हा २०१३ मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे त्यामुळे आसाराम भक्तांना आणि आसाराम यालाही मोठा हादरा बसला आहे. आसाराम हा आधीच जन्मठेपेची शिक्षा भोगत असून आता तो आणखी एका गुन्ह्यात दोषी ठरला आहे. बलात्काराच्या एका प्रकरणात आधीपासून शिक्षा भोगत असलेला आसाराम सद्या जोधपुर येथील कारागृहात आहे. आधीच एका प्रकरणी शिक्षा भोगत असताना आता दुसऱ्या प्रकरणातही त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.
सुरत येथील एका तरुणीवर २०१३ मध्ये बलात्कार केल्याचा आरोप आसाराम याच्यावर होता. या तरुणीच्या बहिणीवर आसाराम याचा मुलगा नारायण साई याने बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी आसारामशिवाय त्याची पत्नी, मुलगी भारती आणि इतर चार अबुयायी हे आरोपी होते. आसाराम याला न्यायालयात व्हर्चुअली हजार केले आणि यावेळी न्यायालयाने त्याला बलात्कार प्रकरणी दोषी असल्याचे जाहीर केले आहे. या खटल्यात त्याला आज मंगळवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. त्याची पत्नी, मुलगी आणि इतर सहा जणांच्या विरोधात आरोप असला तरी सबळ पुराव्याअभावी त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. आसाराम याने २००१ ते २००६ पर्यंत या तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केले होते. मागील वर्षीच आसाराम याने म्हातारपण आणि आजार याचे कारण देत जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता पंरतु त्याला जामीन मिळू शकला नव्हता.
जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना अन्य एका बलात्कार प्रकरणात आसाराम याला दोषी ठरवल्याने आसाराम याला मोठा धक्का बसला आहेच पण अजूनही त्याला अध्यात्मिक गुरु मानणाऱ्या त्याच्या अंधभक्तांनाही हा मोठा हादरा बसला आहे. आज न्यायालयात त्याला शिक्षा सुनावली जाणार असून आता आणखी किती वर्षांची शिक्षा सुनावली जातेय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Asaram Bapu convicted in another rape case) आसाराम यांचे देशात अनेक आश्रम असून त्याच्या आश्रमात अनेक राजकीय नेते आणि कलाकारांनी अनेकदा हजेरी लावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !