BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जाने, २०२३

ठिबक सिंचन पाईप चोरांना रंगेहात पकडले !


शोध न्यूज : शेतातील ठिबक सिंचनचे पाईप चोरून नेत असताना वाहनासह दोघांना रंगेहात पकडण्यात शेतकऱ्यांना यश आले असून पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


मोहोळ तालुक्यातील अंकोली परिसरात शेतातील विद्युत मोटारींच्या चोरीच्या काही घटना या आधीच घडल्या आहेत. शेतातील विद्युत मोटारी चोरीला जात असल्याने शेतकरी चिंतेत असताना आता ठिबक सिंचनच्या पाईप देखील चोरल्या जात असल्याचे समोर आले असून शेतकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडले आहे. याबाबत कोथाळे येथील शेतकरी राहुल भाऊसाहेब पवार यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीनुसार पवार हे आपल्या शेताकडे निघालेले असताना त्यांच्या शेताच्या जवळ असलेल्या उजनी कालव्याजवळच्या रस्त्यावर एक चार चाकी छोटा हत्ती वाहन (एम एच १३ डी  क्यू ४३७० ) दिसले. शेताच्या बांधावर काढून ठेवलेले ठिबक सिंचनचे पाईप या वाहनामध्ये असल्याचे दिसून आले. दोन व्यक्ती हे पाईप घेऊन या वाहनातून निघालेले होते त्यामुळे पवार यांनी हे वाहन थांबवले आणि चौकशी केली. माझ्या शेतातील हे पाईप घेवून कुठे निघालात ? असा सवाल त्यांना विचारला असता त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. 


आपल्या शेतातील पाईप चोरून नेले जात असल्याचे पवार यांना दिसून आले होते त्यामुळे त्यांनी गावातील चंद्रकांत पवार, विवेक हरिश्चंद्र पाटील, भैरवनाथ रामचंद्र, गोंविंद सुर्यकांत पवार, केदार तसेच कोथाळे येथील पोलीस पाटील ज्ञानेश्वर पवार यांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले.  या सर्वांनी मिळून सदर दोन संशयित व्यक्तींकडे चौकशी केली. किशोर उत्तम गजे आणि विलास महेश निंबाळकर या दोन्ही व्यक्ती अंकोली येथील राहणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले. (Farmer caught drip irrigation pipe thieves red-handed) 
वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये शेतात काढून ठेवलेले ठिबक सिंचनचे पाईप आढळून आले. त्यामुळे या शेतकऱ्यांनी वाहनासह पोलीस ठाणे गाठले आणि सदर दोन्ही व्यक्तींच्या विरोधात पोलीस ठाण्यात पाईप चोरीची फिर्याद दिली आहे. या प्रकाराने अंकोली परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून शेतकरी बांधावापुढे अशा चोरांच्या उपद्रवाचा आणखी एक त्रास सुरु झाला असल्याचे दिसून येत आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !