BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२३

एस. टी. बसने आठ वर्षाच्या बालिकेस चिरडले , जागीच मृत्यू !

 



शोध न्यूज : दोन दिवसांपूर्वीच एक दुर्घटना घडली असताना आठ वर्षाच्या एक मुलीला कर्नाटक बसने ठोकरले असून यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आणखी एक घटना घडली असल्याने चिंता आणि संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.




"नरक"वास !! ✪🅾 दुर्गंधीचा 9 वा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ टाकळी उपनगरात "नरक वासा" चा छळवाद सुरूच ! ...परिसरात राहणे झाले कठीण --- ना खंत ना खेद ! ✪


सोलापूर जिल्ह्यात सगळीकडेच अपघाताचे प्रमाण वाढलेले असताना मंगळवेढा तालुक्यातील सलग झालेले दोन अपघात अधिक धक्कादायक ठरले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मंगळवेढा - विजापूर रस्त्यावरील बालाजीनगर फाटा येथे एक दुर्घटना घडली आहे. शिवन्या संतोष पवार ही दहा वर्षाची शाळकरी मुलगी आणि तिची आई दवाखान्यासाठी मंगळवेढ्याला निघालेले होते. त्यासाठी बालाजीनगर फाटा येथे एस टी ची वाट पाहत मायलेकरं उभी होती. याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एका टिपरने या मुलीला चिरडले. टिपरची जोरदार धडक लागल्याने शिवन्या ही मुलगी जागीच ठार झाली. ही घटना घडली तेंव्हा परिसरातील लोक धावून आले पण शिवन्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संताप व्यक्त होत असतानाच आणखी एक दुर्घटना घडली. 

हौदातील पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८ वर्षे वयाच्या शेजल या बालिकेस कर्नाटक राज्य परिवहनच्या बसने (के ए २८ एफ २१२२) जोराची धडक दिल्याने या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.   माउली एच पी पेट्रोल पंपावर असलेल्या हौदातील पाणी  आणण्यासाठी आईसोबत आठ वर्षाची शेजल रस्ता ओलांडून पलीकडे गेलेली होती. पाणी भरून रस्ता ओलांडून अलीकडे येत असताना मंगळवेढ्याकडून चडचणकडे जाणारी कर्नाटक राज्याची प्रवासी बस वेगात आली आणी तिने शेजल या बालिकेस समोरून धडक दिली. या धडकेने ती खाली पडली असतानाच सदर बसचे ड्रायव्हर साईडचे पाठीमागील टायर तिच्या पायावरून, कमरेवरून गेले.  बसच्या टायरखाली चिरडलेल्या शेजलचा जागीच मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात दहा वर्षाची मुलगी मृत्युमुखी पडली आणि लागोपाठ झालेल्या दुसऱ्या अपघातात आठ वर्षाच्या मुलीचा बळी गेला त्यामुळे बेदरकार वाहन चालकांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. मयत शेजलचे कुटुंब हे मूळ गुजरातमधील असून हल्ली ते दामाजी साखर कारखाना येथे रहात आहे. पाणी आणण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा परत येताना झालेल्या अपघातात शेजलचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Accident, An eight-year-old girl was crushed by a bus) सदर अपघाताबाबत विलास जोगराना यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बसचालक हनमप्पा बसप्पा तुराडगी (रा. हरिंदर, विजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कर्नाटक राज्यातील सदर बस देखील जप्त केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !