BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ जाने, २०२३

मैदानात बॉलींग करतानाचा कोसळला बॉलर आणि झाला अंत !



शोध न्यूज : क्रिकेटच्या खेळात बॉलिंग करीत असतानाच बॉलर तरुण कोसळला आणि फलंदाजांची विकेट घेण्याआधी या तरुण बॉलरच्याच आयुष्याची विकेट पडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मैदानात अन्य  खेळाडूंच्या समोर घडली.  


अलीकडे व्यायाम करताना आणि खेळ खेळताना तरुणाचा मृत्यू होण्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. क्रिकेट खेळताना चेंडू लागून काही दुर्घटना घडल्या आहेत परंतु खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन खेळाडूचा अंत होण्याचाही काही घटना समोर आलेल्या आहेत. नाशिक येथेही अशी एक अत्यंत वाईट आणि हृदयद्रावक घटना क्रिकेट मैदानावर घडली. नाशिकच्या  कॉलेज रोड परिसरातील मैदानावर क्रिकेटचा सामना सुरु असताना आकाश रवींद्र वाटेकर या बॉलरचा अचानक मृत्यू ओढवला आहे. एलबीटी लॉ कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट सामना रंगात आलेला असताना तरुण बॉलर आकाश वाटेकर हा बॉलिंग करीत होता. (Death of a young bowler while bowling in the field) बॉल टाकत असतानाच त्याच्या छातीत जोराची कळ आली आणि तो मैदानावरच खाली कोसळला. 


अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळे खेळाडू आणि काही प्रेक्षक देखील त्याच्या दिशेने मैदानात धावले. तो कोसळण्यापूर्वी काही वेळ आधीच त्याला अस्वस्थ वाटत होते आणि यावेळी त्याच्या एका मित्राने त्याला जवळच्याच एका मेडिकल दुकानातून गोळी आणून दिली होती. ही गोळी घेऊन त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केली होती. गोळी घेतल्यानंतर त्याला थोडेसे बरेही वाटले होते म्हणून तो पुन्हा बॉलिंग करू लागला होता पण बॉल टाकतानाच तो खाली कोसळला. यावेळी मात्र त्याच्या मित्रानी थोडाही वेळ वाया न घालावेत जवळच्या रुग्णालयात नेले परंतु तोपर्यंत सगळा खेळ संपला होता. 


क्रिकेट खेळत असताना मैदानावरच आकाशला "हार्टअटॅक" आलाआणि त्यातच  आकाशला जीव गमवावा लागला, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आकाशच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याचे मित्र आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मित्रांच्या डोळ्यादेखत या तरुण खेळाडूने अखेरचा श्वास घेतला त्यामुळे त्याच्या मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !