BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ जाने, २०२३

मयत आजी झाल्या स्मशानभूमीत जिवंत !

 




शोध न्यूज : डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलेल्या एक आजी अंत्यसंस्कारापुर्वी स्मशानभूमीत जिवंत झाल्याची आणखी एका घटना समोर आली असून कुटुंबाला झालेला आनंद मात्र अधिक काळ टिकू शकला नाही.


मृत व्यक्ती जिवंत झाल्याच्या अनेक घटना या आधीही घडल्या आहेत. अंत्यसंस्कार करण्याच्या अंतिम क्षणी मृतादेहाने हालचाल केल्याचे आणि डोळे उघडल्याच्या काही घटना घडून गेल्या आहेत. सदर व्यक्ती मृत झाला नसताना नातेवाईकांनी तसा गैरसमज केला असावा असाही कयास अशा घटनात लावला जातो पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्यावर तर काही शंका उरण्याचे कारण उरत नाही. तशा घटनाही घडतात. उत्तर प्रदेशातील एक घटनेने अशाच प्रकारे अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. अर्थात हा आनंद अधिक काळ टिकला नाही पण घडलेल्या घटनेने सगळेच विस्मयचकित झाले आहेत. 


फिरोजाबाद येथील कस्बे बिलासपुर येथे राहणाऱ्या आजी हरीभेजी या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या त्यामुळे त्यांना एका मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांचा मेंदू निकामी झाला आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबाने शोक व्यक्त करीत त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली. नातेवाईक, पै पाहुणे सगळे गोळा झाले होते. (Dead grandmother turned alive in the cemetery) अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यांचावर अंत्यसंस्कार करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आणि अचानक मृत आजीने डोळे उघडले. हा प्रकार पाहिल्यावर स्मशानभूमीत एकच गोंधळ उडाला आणि प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करू लागला. 


मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी आजीबाईला मृत घोषित केले होते आणि तेंव्हापासून सगळी तयारी होईपर्यंत आजीबाई निपचित पडलेल्या होत्या. स्मशानात आणण्यात आले, सगळी तयारी झाली आणि नंतर हरीभेजी यांनी डोळे उघडले होते. त्यामुळे एकीकडे आनंद आणि दुसरीकडे आश्चर्य अशा अवस्थेत सगळे होते. सगळ्यांची पळापळ सुरु झाली होती. कुटुंबाने आजीबाईना परत घरी नेले. घराचे सगळे वातावरणच बदलून गेले होते. घरी आल्यावर आजीबाईना पाणी देण्यात आले, त्यानंतर त्यांनी चहा देखील घेतला. या घटनेची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि जिकडे तिकडे हाच विषय चर्चेचा बनला. कुटुंबात तर प्रचंड आनंद व्यक्त होत होता पण दुर्दैवाने हा आनंद अधिक काळ टिकला नाही. दुसऱ्या दिवशी या आजीबाई पुन्हा मृत्युमुखी पडल्या. पुन्हा एकदा त्यांना स्मशानात नेण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !