BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जाने, २०२३

पोलीस पाटील आहे म्हणत लाखोंची केली फसवणूक !

कुणाची घाण, कुणाला त्रास !

✪ 🅾 दुर्गंधीचा तिसरा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ लक्ष्मीटाकळी उपनगरात गटार तुंबलेलीच ! लक्षपूर्वक दुर्लक्ष, वाढू लागली दुर्गंधीची व्यापकता ! ...! ✪



शोध न्यूज : पोलीस पाटील असल्याचा रुबाब दाखवत आणि आपल्या खूप ओळखी असल्याची बतावणी करीत आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने पैसे गुंतविण्यास भाग पाडून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


फसवणुकीचे प्रकार सगळीकडे सर्रास सुरु असतात आणि यात आर्थिक विषयक फसवणूक अधिक प्रमाणात होत असते. कुणीही कुणाला काहीही फुकट देत नसते हे माहित असतानाही लोक जादा परतावा देण्याच्या अमिषाला बळी पडतात आणि अशा प्रकरणात फसवणूक करून घेतात. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे.  भाजीपाला विक्रेत्या लक्ष्मी सदाशिव नायकुडे (रा. बनकर वस्ती, सांगोला) यांना त्यांचे नातेवाईक रामचंद्र तुकाराम सरगर (सांगोला) यांनी २९ डिसेंबर २० रोजी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो, असे सांगून त्यांच्या ओळखीचे अमोल बबन नलवडे व त्यांची पत्नी संध्या अमोलनलावडे यांनी असे मिळून त्यांच्या घरी आले व तुम्हाला चांगला नफा कमवून देतो, शेअर मार्केटचे ट्रेनिंग सुद्धा देतो असे सांगितले. त्यांची पत्नी संध्या नलवडे यांनी मी पोलीस पाटील असून तुम्ही कसलीही काळजी करू नका माझ्या वरिष्ठ अधिकारी वर्गाबरोबर ओळखी असल्याने तुम्हाला अडचण येऊ देणार नाही, असे सांगून आमच्या कंपनीमध्ये शेअर मार्केट बाबत शिकवण्याचा कोर्स असून त्याद्वारे आम्ही तुम्हाला शेअर मार्केटचे प्रशिक्षण देऊन पुढे जाऊन इन्व्हेस्टमेंट केल्यास ६ टक्के महिन्याला देणार असे सांगितले.


आपल्याकडे अनेकांनी मोठी गुंतवणूक केली असून त्यांना चांगला परतावा देखील दिला आहे अशा भूलथापा देत विश्वास संपादन केला.  त्यांच्यावर विश्वास ठेवून सुमारे १ लाख १० हजार रुपये नलवडे यांच्या हातात दिले. यावर त्यांनी सदर पैसे एलएलपी या कंपनीमध्ये गुंतवल्याबाबतचे त्यांच्या नावे १ लाखाचे सर्टिफिकेट देवून इतर रकमेचे सर्टिफिकेट नंतर देतो म्हणून अद्याप पर्यंत दिलेली नाहीत. त्यानंतर लक्ष्मी नायकुडे यांनी गुंतवलेल्या रक्कमेवर संबंधित कंपनीच्या बँक खात्यावरून ६ टक्क्यांनी परतावा दोन महिने मिळाला व त्यामधून चार्ज व टीडीएस चार्जेस कट करून आमच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे. त्यानंतर दोन महिने होऊन सुद्धा त्यांच्या खात्यावर वरील प्रमाणे परतावा जमा होत नसल्याने त्यांनी अमोल नलवडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित कंपनीचे डायरेक्टर अभिजीत धोंडीबा सावंत (रा. कोल्हापूर) यांचेवर गुन्हा दाखल झाला आहे.


सदर प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यानंतर  जून महिन्यापर्यंत बाहेर आल्यावर तुमचे पैसे देतील, असे सतत सांगण्यात आले परंतु प्रत्यक्षात रक्कम परत मिळालीच नाही.  त्यानंतरही  वारंवार पैशाची मागणी करून सुद्धा वेळोवेळी अमोल नलवडे यांनी टाळाटाळ केली. (Lure of excessive returns, financial cheating Case file) लक्ष्मी नायकुडे यांनी यांच्याप्रमाणेच रामचंद्र सरगर यांना १ लाख ३० हजार रुपये, प्रकाश सावळा म्हमाणे यांना ६ लाख १० हजार रुपये, प्रकाश विठ्ठल गायकवाड यांना २ लाख १० हजार रुपये असे एकूण ११ लाख ४० हजार रुपयांची नलवडे पती-पत्नीने व संबंधित कंपनीचे संचालक अभिजीत धोंडीबा सावंत यांनी फसवणूक केली असल्याची फिर्याद दाखल केली आहे. सदर फिर्यादीवरून सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


भाजीपाला विक्रेत्या महिलेसह अन्य तिघांची ११ लाख ४० हजार रुपयांची  फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द येथील  अमोल बबन नलवडे, त्यांची पत्नी संध्या अमोल नलवडे आणि  शुभ ट्रेडबिझ इंडिया एल.एल. पी. या कंपनीचे संचालक अभिजीत धोंडीबा सावंत (कोल्हापूर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !