BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जाने, २०२३

पुढील दोन दिवस महाराष्ट्र गारठणार ! हवामान विभागाचा इशारा !


Title of the document

 


शोध न्यूज : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडीचे प्रमाण वाढले असतानाच हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवसात महाराष्ट्र गारठून जाणार आहे. 


हिवाळा सुरु झाला तरी थंडी जाणवत नव्हती परंतु आता नव्या वर्षासोबत थंडी वाढलेली असून देशातील अनेक भागात तपमानात मोठी घट झाली आहे त्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे तर येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे.  पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, दिल्ली, चंडीगड या राज्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट चा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात देखील तपमान घसरले असून राज्यात अनेक ठिकाणी १० ते १२ अंश सेल्सियस तपमान आहे तर काही ठिकाणी हे तापमान एका अंकावर उतरले आहे. 


तापमानात घट झाल्याचा  परिणाम म्हणून कडाक्याची थंडी पडू लागली असून हुडहुडी भरू लागली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तापमान आणखी घटणार असून विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. (Cold will increase in next two days in Maharashtra) पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला  आहे.


वाढत्या थंडीत काळजी घेणे अत्यावश्यक बनले असून या काळात हृदय विकाराचे झटके येण्याची अधिक शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हिवाळ्यात वृद्धांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो, अलीकडे अशा प्रकारचा धोका तरूण वर्गात देखील दिसून येत आहे. यापासून बचाव करण्यासाठी थंडीच्या दिवसात सूर्योदय होण्यापूर्वी फिरायला जाणे टाळावे असा सल्ला फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज कुमार यांनी दिला आहे. थंडीच्या दिवसात धुम्रपान आणि मद्यपान केल्याने शरीर उबदार राहील असा काहींचा गैरसमज असतो, असे काहीही होत नसते. बाहेर फिरायला जाणे टाळावे परंतु घरात सक्रीय राहावे असे आवाहनही डॉ. मनोज कुमार यांनी केले आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !