BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जाने, २०२३

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासुबाईचा अखेर राजकीय पक्षात प्रवेश !


शोध न्यूज : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे राजकारणावर जोरदार प्रहार करतात पण आता त्यांच्याच सासूबाई सरपंचपदी निवडून आल्या असून त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 


"नरक"वास !! ✪🅾 दुर्गंधीचा 7 वा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ टाकळी उपनगरात तुंबलेल्या गटारीने प्रचंड दुर्गंधी, "नरक वासा" चा अनुभव ... नागरिकांचा कुणाला कळवळा येईल काय ? ! ✪


आपल्या नर्मविनोदी आणि खुसखुशीत शैलीत प्रसिद्ध कीर्तनकार समाजातील अनिष्ठ रूढी, प्रथावर सणसणीत प्रहार करतात. अनेकदा त्यांच्या काही विधानांमुळे वादाचे प्रसंगही उभे राहिले. राजकीय परिस्थितीवर तर ते अत्यंत सडकून टीका करतात तर कधी काही नेत्यांचे गुणगाणही गातात. राजकारण आणि राजकारणी अशा कुणाचाच आपला संबंध नाही असे देखील ते आवर्जून सांगत असतात पण आता त्यांच्याच सासूबाई शशिकला पवार या सरपंच झाल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावातून त्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या आणि निवडूनही आल्या. त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्याने कुणाला पाठींबा देणार ? कुठल्या राजकीय पक्षाशी जवळीक साधणार ? असे काही प्रश्न उरले होते पण त्याचेही उत्तर आज मिळाले आहे आणि याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


अपक्ष सरपंच शशिकला पवार यांच्या पक्षप्रवेशाची अनेकांना उत्सुकता लागलेली होती. आज मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाला आपला पाठींबा दिला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला. दरम्यान शशिकला पवार या आमच्या गटात असल्याचा दावा थोरात गटाकडून देखील करण्यात आला होता परंतु आज मात्र अपक्ष सरपंच शशिकला पवार यांनी आपल्या हातात 'कमळ' घेतले आहे त्यामुळे आता सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.  गावाच्या विकासासाठी आपण भाजपात प्रवेश केल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. राजकारण हे आपले क्षेत्र नाही परंतु आपण केवळ गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरलो आहोत. आम्ही वारकरी असून निवडणूक लढविण्यास इंदुरीकर महाराज यांचाही विरोध होता असे त्यांनी सांगितले. कितीही चांगले काम केले तरी शिंतोडे उडवले जातात, आपले क्षेत्र वेगळे आहे असे इंदुरीकर महाराज सांगत होते परंतु सर्वसामान्य जनतेसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले आहे. 


धोका देऊ नका - इंदुरीकर 
लोकांची सेवा करायची संधी मिळाली आहे तर संधीचे सोने करून प्रामाणिकपणे जनतेची सेवा करा, मान अपमान समान धरून कुणी काही बोलले तरी ते सहन करा, सामान्य जनतेने तुमचा हात धरला आहे त्या हाताला धोका होऊ देवू नका (Sarpanch mother-in-law of Indurikar Maharaj joins BJP) असे इंदुरीकर महाराज म्हणाले असल्याचेही सरपंच शशिकला पवार यांनी सांगितले आहे.




.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !