BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२३

फटाका स्फोटातील जखमी पाचव्या महिलेचाही दुर्दैवी मृत्यू !

 


शोध न्यूज : बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्यास लागलेल्या आगीत जखमी झालेल्या आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असून आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या पाच झाली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीजवळ असलेल्या आणि विनापरवाना सूरु असलेल्या फटाका स्फोटात आत्तापर्यंत चार मृत्यू झाले होते परंतु यातील जखमी असलेल्या आणखी एका महिलेचा उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या पाचवर गेली आहे. या घटनेत पांगरी येथील ३० वर्षीय महिला कौशल्या बगाडे या जखमी झाल्या होत्या आणि त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान कारखाना मालक युसुफ मणियार आणि त्याच्या  वासिम आणि समीर या दोन मुलानाही पोलिसांनी अटक केलेली आहे. 


फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात सुमन ऊर्फ सुमित्रा ज्ञानोबा जाधवर (वय ५६, रा. वालवड, ता. बार्शी) व गंगाबाई मारुती सांगळे (वय ५०, रा. उक्कडगाव), मीना बाबासाहेब मगर (वय ५२, रा. पांगरी, ता.बार्शी) व मोनिका संतोष भालेराव (वय ३०, रा. वालवड) असे या चार महिलांचा मृत्यू झाला होता आणि   कौशल्या सुखदेव बगाडे (वय ३०, रा. पांगरी) या जखमी होत्या. मृत्यूशी त्यांची सुरु असलेली झुंज देखील संपुष्टात आली आणि या झुंजीत कौशल्या बगाडे यांचा पराभव झाला. उपचार घेत असताना त्यांचाही मृत्यू झाला आणि या घटनेतील मृतांचा आकडा पाच वर जाऊन पोहोचला आहे. 


युसुफ मणियार या कारखाना मालकाला अटक केल्यानंतर त्याची मुले वासिम मणियार, समीर मणियार हे दोघे मुंबईला निघाले होते परंतु पोलिसांनी त्यांना कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर अटक केली आणि न्यायालयासमोर उभे केले. (A fifth woman also died injured in the firecracker explosion) न्यायालयाने याप्रकरणी आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत. यातील कारखाना भागीदार नाना पाटेकर अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !