BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जाने, २०२३

फटाका कारखान्यात स्फोट, पाच जणांचा मृत्यू !

 




शोध  न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली असून फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा आकडा मात्र चुकीचा निघण्याची शक्यता आहे.


आज जगभर नव्या वर्षाचा जल्लोष सुरु असताना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे जिंदाल कंपनीत स्फोट झाल्याच्या बातमीने महाराष्ट्र हादरला असतानाच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शोभेची दारू तयार करणाऱ्या एका कारखान्यात मोठा स्फोट झाला आणि यामुळे लागलेल्या आगीत पाच कामगार ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे.  बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात आज ही दुर्घटना घडली आहे. या कारखान्यांत ४० पेक्षा अधिक कामगार काम करीत असताना ही दुर्घटना घडली आहे.या कारखान्यात फटाके बनविण्याचे काम सुरु असतांना अचानक स्फोट झाला आणि मोठी आग लागली त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. चार एकर परिसरात हा कारखाना विस्तारला आहे. 


सदर फटाका फॅक्टरीमध्ये बांगरवाडी, वालवड, उकडगाव या भागातले कामगार काम करत होते. या घटनेत पाच जणांचे मृतदेह आढळले असल्याचे स्थानिकाकडून सांगण्यात आले आहे. कारखान्यात झालेल्या स्फोटाचा आवाज पाच दहा किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला एवढा मोठा स्फोट या कारखान्यात झाला आहे. (Explosion in firecracker factory, five people killed) बार्शी येथील अग्निशामक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पाच जणांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला असल्याचे सांगितले गेले असले तरी याबाबत निश्चित माहिती हाती आली नाही. सुरुवातीला फक्त तीन महिलांचे मृतदेह मिळाले आहेत. 


स्फोटाचा आवाज येताच परिसरातील नागरिक आणि तरुण या कारखान्याकडे धावले आणि  त्यांनी  ही भीषण परिस्थिती पाहिली. मृताना बाजूला काढत जखमींना मदत करण्याचे तातडीचे काम या तरुणांनी केले. त्यानंतर प्रशासन पोहोचले आणि पुढील कार्यवाही सुरु झाली. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !