BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ जाने, २०२३

जामीन दिला नाही म्हणून तरुणाची हत्या !


शोध न्यूज : केवळ जामीन न दिल्याच्या कारणावरून माढा तालुक्यातील एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूर - टेंभुर्णी रस्त्यावर अकोले बुद्रुक येथे घडलेल्या या खून प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अलीकडे गुन्हेगारी अत्यंत सामान्य बनली असून किरकोळ कारणासाठी देखील माणूस माणसांच्या जीवावर उठलेला दिसत आहे. केवळ कर्जासाठी जामीन न दिल्याच्या रागातून देखील एका तरुणाचा खून करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानुसार अकोले येथील अविनाश युवराज परबत याला ट्रक विकत घ्यायचा होता. त्यासाठी त्याला जामीन आवश्यक होता. कर्ज घेण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता होती. जामीन देण्यासाठी त्याने शुभम विठ्ठल काळे या २४ वर्षाच्या तरुणाकडे मागणी केली परंतु विपुल याने जामीन राहण्यास नकार दिला. याचा राग अविनाश परबत याला आलेला होता आणि यातून शुभम याचा भाऊ विपुल विठ्ठल काळे याचा थेट खून करण्यापर्यंत मजल गेली आहे.


कर्ज घेण्यासाठी जामीन न राहिल्याचा राग मनात धरून तीन अविनाश युवराज परबत, विठ्ठल संतोष नवले व शुभम संतोष नवले  या आरोपींनी फिर्यादी शुभम काळे यास शिवीगाळ केली. याच वादातून पुढे विपुल विठ्ठल काळे या तरुणाचा खून करण्याची घटना घडली. धारदार शस्त्राने खून करून विपुल याचा मृतदेह अकोले बुद्रुक शिवारात दिनकर कोथमिरे यांच्या शेताजवळ फेकून देण्या आला. (Murder of youth in Madha taluka for minor reason) पंढरपूर - टेंभुर्णी रस्त्यावर ही घटना घडली असून याबाबत मयताचा भाऊ शुभम काळे याने टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अविनाश युवराज परबत, विठ्ठल संतोष नवले व शुभम संतोष नवले या तिघाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अत्यंत किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्यामुळे माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !