श्रद्धांजली !
भीमा पाटबंधारे विभागातील निवृत्त शाखाधिकारी प्रभू खंडू मदने यांचे अपघाती निधन ! एक दिलदार आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व हरपले ! भावपूर्ण श्रद्धांजली !
शोध न्यूज : नायब तहसीलदार असलेल्या आशा वाघ यांना भर रस्त्यात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून हा त्यांच्यावर झालेला दुसरा मोठा हल्ला आहे.
राज्यात वाळू तस्करांचा प्रभाव वाढला असून यातून तहसीलदार पदावरील अधिकाऱ्यांनाही धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्यावर हल्ले होतात तसेच वाहनाखाली चिरडण्याचा देखील प्रयत्न केला जातो परंतु बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यावर नायब तहसीलदार आशा वाघ यांना अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात आणि महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेतून आशा वाघ बचावल्या आहेत परंतु त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. हा हल्ला कुणी वाळू माफियांनी केलेला नसून कौटुंबिक कारणातून झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही त्यांच्यावर असाच मोठा हल्ला झाला होता आणि तो हल्ला कौटुंबिक कारणावरून त्यांच्या भावानेच केलेला होता.
संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावरील हा जीवघेणा हल्ला भर रस्त्यावर झाला. नायब तहसीलदार आशा वाघ या मोपेडवरून तहसील कार्यालाकाकडे निघाल्या असताना एका चार चाकी वाहनाने त्यांना अडवले. रस्त्यावर आडवी गाडी लावून त्यांना रोखण्यात आले आणि या गाडीतून एका महिलेसह चार जण खाली उतरले. रस्त्यावर गाडी लावल्याने आशा वाघ यानाही आपली मोपेड थांबवावी लागली. गाडीतून उतरलेल्या लोकांनी त्यांच्यावर थेट हल्ला केला. बाटलीतून आणलेले पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु सुदैवाने या हल्ल्यातून त्या बचावल्या. आशा वाघ यांच्या भावजय व तिच्या नातेवाइकांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत आधी पाठीमागून गळा आवळला व नंतर अंगावर पेट्रोल टाकले. पेटवत असताना आशा यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. हल्ला करून हल्लेखोर तेथून पळून गेले आणि नायब तहसीलदार यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. भर रस्त्यावर झालेल्या या थरारक घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
सदर हल्ला कौटुंबिक वादातून झाला असल्याची माहिती समोर येत असून यापूर्वीही त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला होता. त्यांच्या भावानेच त्यांच्यावर आधीचा हल्ला केलेला होता. (Attempt to Murder, lady Tahasiladar aasha wagh by burning-petrol) भाऊ मधुकर दयाराम वाघ याच्याशी गावातील जमिनीचा वाद सुरु होता आणि यातून ६ जून २०२२ रोजी तहसील कार्यालयातच आशा वाघ यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांचा शेवट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यातूनही त्या थोडक्यात बचावल्या होत्या, सख्खा भाऊ मधुकर वाघ याच्या विरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून अजूनही तो बीड येथील कारागृहात आहे. यानंतर हा दुसरा हल्ला झाला आणि त्यातूनही त्या बचावल्या आहेत. भर रस्त्यावरील हा थरार अत्यंत धक्कादायक असून बीड जिल्हा या घटनेने हादरून गेला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !