BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२३

दरोड्यातील आरोपीने न्यायमुर्तीना चप्पल फेकून मारली आणि --

 


शोध न्यूज : दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने थेट न्यायालयात न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली असल्याची घटना नांदेड न्यायालयात घडली.
 
न्यायालयात आरोपीला आणले जाते तेंव्हा कसलाही आरोपी न्यायालयासमोर अदबीने उभा राहत असतो, बाहेर दादागिरीने वागणारे गुन्हेगार देखील न्यायालयासमोर हात जोडून उभे असतात पण काही माथेफिरू न्यायालयालाही आपली दादागिरी दाखविण्याचा प्रयत्न करतात. अशा एका आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात रुबाब दाखवायचा प्रयत्न केला पण न्यायालयाने त्याला त्याची जागा दाखवली आहे. दरोड्याच्या गुन्ह्याची सुनावणी सुरु असताना दरोडा प्रकरणातील आरोपी दत्ता हंबर्डे हा न्या. एस. ई. बांगर यांच्या न्यायालयालासमोर आला. सुनावणी सुरु असतानाही सोबत वकील नसल्यामुळे आरोपीने थेट न्यायाधीशांशी वाद घालायला सुरुवात केली आणि या वादात माथेफिरू आरोपीने चक्क पायातली चप्पल न्यायमूर्तीच्या अंगावर भिरकावली. सुदैवाने ती चप्पल न्यायाधीशांना लागली नाही.

आरोपी समोर आला असताना सुनावणीसाठी त्याचे वकील आलेले नव्हते त्यामुळे न्यायालयाने त्याच्याकडे वकीलाबाबत विचारणा केली. पण आरोपी दत्ता हंबर्डे हुज्जत घालू लागला. न्यायालयाशी वाद घालू लागल्याने पोलीस कर्मचारी आणि न्यायालयीन कर्मचारी देखील गोंधळून गेले. यावेळी अनेक वकीलही कोर्टात उपस्थित होते. हा वाद वाढत त्याने पायातील चप्पल काढली आणि थेट न्यायाधीशांकडे फेकून मारली. यावेळी कोर्टरूममध्ये एकच गोंधळ उडाला तर पोलिसांची देखील पंचाईत झाली. कोरोनाच्या काळात न्यायाधीशांच्या समोर काच लावलेली आहे त्यामुळे ही चप्पल न्यायाधीशांच्या पर्यंत पोहोचू शकली नाही. या प्रकाराने मात्र न्यायालयात एकच गोंधळ आणि पळापळ सुरु झाली. वकील मंडळीही हैराण होऊन हा प्रकार पाहत होती. पोलिसांनी मात्र लगेच पुढे सरसावत या आरोपीला ताब्यात घेतले. 

न्या. एस. ई. बांगर यांनी या आरोपीला लगेच कायद्याचा इंगा दाखवला. चप्पल फेकल्याप्रकरणी आरोपी दत्ता हंबर्डे याला लगेच सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (The accused in the robbery threw a shoe at the judge) न्यायालयात दादागिरी दाखवणे त्याला चांगलेच महागात पडले पण या घटनने न्यायालयाच्या परिसरात खळबळ उडाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !