BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ जाने, २०२३

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत अजित पवार यांनी दिली माहिती !

 


शोध न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना अपघातानंतर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

 

धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत अपघात झाल्याची बातमी राज्यात पसरली तेंव्हा राष्टवादी कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्यात प्रचंड काळजी निर्माण झाली. परळी येथे आपल्या घराकडे निघाले असताना त्यांच्या गाडीला मध्यरात्री अपघात झाला. ग्रामीण भागातून ते परळी शहरात आल्यावर त्यांच्या बीएमडब्लू गाडीचा घराच्या जवळ असलेल्या मौलाना आझाद चौकात अपघाताची घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी चौकात अपघात झाल्यानंतर मुंडे यांना दुसऱ्या गाडीने घरी सोडण्यात आले आणि डॉक्टरांनी घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती तेंव्हा त्यांच्या छातीत मार लागल्याचे आढळून आले होते. दोन ठिकाणी फ्रॅक्चर असल्याचे यावेळी निदर्शनास आले होते. 


धनंजय मुंडे यांना विशेष विमानाने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्यांच्या तपासण्या झाल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्टवादीचे नेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे यांच्यासह काही नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. नेत्यांनी मुंडे यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालया प्रशासनाशी चर्चा केली असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे काही कारण नसल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्टवादीचे प्रमुख शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदी नेत्यांनी मुंडे यांच्या प्रकृतीची फोनवरून चौकशी करून त्यांना लवकर आराम मिळावा यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


रुग्णालयात जाऊन अजित पवार यांनी मुंडे यांची भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यानंतर पवार यांनी माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागल्याने त्यांचा दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. खालच्या बाजूच्या ७ आणि ८ क्रमांकाच्या बरगड्या फ्रॅक्चर असून डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहेत अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकारांना दिली आहे. (Ajit Pawar's information about leader Dhananjay Munde's health)  मुंडे यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना किती दिवस रुग्णालयात ठेवावे लागेल हे गुरुवारी सायंकाळपर्यंत समजणार आहे. काळजीचे काही कारण नाही परंतु त्यांना विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. तरीही आगामी २४ तास त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे असे पवार यांनी पत्रकारांना सांगितले आहे. 


रुग्णालयात येण्यापेक्षा मुंडे यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी शुभेच्छा द्या अशी विनंतीही अजित पवार यांनी सहकारी आणि कार्यकर्त्यांना केली आहे. मुंडे यांची प्रकृती काळजी करण्यासारखी नाही, त्यांना विश्रांती आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले आहे. रात्रीचा प्रवास टाळावा असे आवाहन अजित पवार यांनी पुन्हा केले आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !