शोध न्यूज : शिपाई असलेल्या आईबापाची मुलगी आता न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसणार असून न्यायदानाचे काम करणार आहे, प्रतिकूल परिस्थितीत सोलापूर जिल्ह्याच्या लेकीने मिळवलेल्या या यशाचे राज्यभर कौतुक होऊ लागले आहे.
जिद्द असली की काहीही करता येते आणि आभाळाला देखील कवेत घेता येते हे सोलापूर जिल्ह्यातील शेळगी येथील स्नेहा सुनील पुळूजकर यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारी अनेक मुले नेत्रदीपक कामगिरी करतात याची अनेक उदाहरणे समोर असतानाच आई आणि वडील शिपाई पदावर काम करीत असताना मुलीने मात्र न्यायाधीश पदापर्यंत मजल मारली आहे. शेळगी येथील स्नेहा ही नायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिच्या या यशाचे राज्यभर कौतुक होताना दिसत आहे. वडील सुनील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई असून आई उज्वला या जिल्हा आरोग्य विभागात शिपाई पदावर काम करीत आहेत. त्यांना तीन मुले असून अत्यंत काटकसरीत त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तरीही मुले मोठी झाल्यावर परिस्थिती बदलेल या आशेवर त्यांनी पोटाला चिमटे घेत संसार चालवला.
पुळूजकर दाम्पत्यांच्या मुलांनीही त्यांची ही अपेक्षा सार्थ ठरवली असून त्यांच्या या मुलीने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. भाड्याच्या घरात राहत या दाम्पत्याने केवळ आपल्या मुलांच्या भविष्याचाच विचार केला आणि स्वत: अडचणीत जगत मुलांच्या शिक्षणाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले त्यामुळे त्यांची मुलेही शिकली. त्यांचा मोठा मुलगा सुजित हा स्वॉफ्टवेअर इंजिनिअर असून दुसरा मुलगा वकील आहे. स्नेहा देखील आता न्यायमूर्ती होत आहे. इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये स्नेहाने विद्यापीठात सुवर्णपदक देखील मिळवलेले आहे. (Admirable! The daughter of Peon parents became a judge) महागडी पुस्तके विकत घेण्याची परिस्थिती नसताना स्नेहाने पंधरा ते अठरा तास अभ्यास केला आणि उज्ज्वल यश मिळवून आपल्या आई वडिलांचे स्वप्नं तिने सत्यात उतरवले आहे. तिच्या या यशाचे मोठी कौतुक होऊ लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !