BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जाने, २०२३

आधी अपघात, नंतर पेटली कार, पाच जणांचे प्राण आले धोक्यात !

 


शोध न्यूज : आधी झाला थरारक अपघात आणि त्यानंतर कारने पेट घेतल्याने पाच जणांचा प्राण धोक्यात आला होता परंतु परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्यामुळे सुदैवाने सर्वांचे प्राण बचावले आहेत. 


रत्नागिरी -  नागपूर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले असून या मार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. अपूर्ण मार्गावरून वाहतूक सुरु असल्याने हे अपघात वाढत आहेत परंतु मार्गाचे काम रखडलेलेच आहे. आजवर या मार्गावर अनेक अपघात झाले असून प्रवाशांचे प्राण जात आहेत. किरकोळ स्वरूपाचे अपघात तर नित्याचेच झाले आहेत परंतु मोठे अपघात देखील या मार्गावर होत आहेत. बोलवाडजवळ पुन्हा एक अपघात झाला परंतु मोठ्या संकटातून पाच जण सुदैवाने बचावले आहेत. कारला आधी अपघात झाला आणि त्यानंतर या कारने अचानक पेट घेतला त्यामुळे पाच जणांच्या प्राणावर मोठे संकट आले होते. अपघात होताच परिसरात असलेल्या नागरिकांनी धावत जाऊन मदत केली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 


महामार्गाच्या बायपास रस्त्यावर बोलवाड जवळ हा अपघात झाला आहे.  पंढरपूर रस्त्याकडून राष्ट्रीय महामार्गावरून आलेल्या कारला हनुमाननगर येथे हा अपघात झाला. रस्त्याचे काम सुरु असून त्यासाठी रस्त्यावर टाकलेल्या माती आणि खडीच्या ढिगाऱ्यावर ही धावती कार गेली त्यामुळे अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. या कारमधून मेहता कुटुंबातील पती पत्नी आणि तीन लहान मुले प्रवास करीत होते. कारच्या काचा बंद करण्यात आलेल्या होत्या आणि धावती कार उलटी झाली होती. हा अपघात होताच जवळ असलेल्या नागरिकांनी धाव घेतली आणि गाडीच्या काचा फोडून मेहता कुटुंबाला बाहेर काढण्यात आले. या अपघातात ते जखमी झाले परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 


कारचा अपघात झाला आणि त्यानंतर कारने अचानक पेट घेतला त्यामुळे मोठे संकट उभे राहिले होते. जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि अग्निशामक दल तसेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तातडीने अग्निशामक दल दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, दरम्यान कार जळून खाक झाली होती. सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Accidental car caught fire, five injured, Luckily survived) जवळच्या नागरिकांनी तातडीने मदत केली नसती तर फार मोठा अनर्थ घडला असता. अपघात झालेली आणि काचाही बंद असलेली कार पेटली त्यामुळे यातून कुणीच वाचण्याची शक्यता नव्हती.  नागरिकांनी दाखवलेल्या चपळाईमुळे पाच जणांचे प्राण वाचले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !