BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२३

घरगुती गॅसचा काळाबाजार, पंढरपुरात दोघांना अटक !




शोध न्यूज : प्रचंड धोकादायक असल्याचे माहित असूनही घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी धाड टाकून जेरबंद केले आहे. अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये भरण्याचा बेकायदा प्रकार पंढरीत पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. 




"नरक"वास !! ✪🅾 दुर्गंधीचा 9 वा दिवस ! 🅾 ✪ 🅾️ टाकळी उपनगरात "नरक वासा" चा छळवाद सुरूच ! ...परिसरात राहणे झाले कठीण --- ना खंत ना खेद ! ✪


घरगुती वापराचा गॅस हा व्यावसायिक कारणासाठी वापरता येत नाहीच परंतु त्याचा बेकायदा वापर वाहनांसाठी करण्यात येत असतो. गॅस टाकीतून वाहनात गॅस भरणे हे धोक्याचे ठरत असते आणि अशा बेकायदा प्रकारात अनेकदा दुर्घटनाही घडलेल्या आहेत तरीही पैशाच्या मोहासाठी काहीजण हे गैरकृत्य करीत असतात. या प्रकारात स्फोट होऊन स्वत:बरोबर इतरांच्या प्राणालाही धोका उत्पन्न होत असतो. चोरट्या मार्गाने हे धंदे करण्याचे प्रकार पंढरपूरमध्ये या आधीही उघडकीस आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तरीही छुपेपणाने असे प्रकार सुरूच असतात. अशाच प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून या गैरप्रकारचा पर्दाफाश केला आहे.  घरगुती वापराचा गॅस बेकायदेशीररित्या वाहनामध्ये भरून गॅसचा काळाबाजार करण्यात येत होता. येथे पोलिसांनी छापा टाकून गॅस भरण्याच्या साहित्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


संत कैकाडी महाराज मठाच्या मागच्या बाजूस अशा प्रकारे अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस  वाहनात भरून दिला जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी येथे छापा टाकला असता हा प्रकार उघडकीस आला. पत्र्याच्या एका खोलीत दोन गॅस सिलेंडर, वजनकाटा, गॅस भरण्यासाठी लागणारी मोटार असे साहित्यही आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता नितीन माळवे (अनिल नगर) याने या साहित्याचा वापर अवैधरित्या वाहनामध्ये गॅस भरण्यासाठी करीत असल्याचे कबूल केले.  (Domestic gas black market, two arrested in Pandharpur) दुसऱ्या एका ठिकाणी  अंबाबाई मंदिराजवळ भीमा नदीकाठावर एका पत्राशेडमध्ये छापा टाकून पोलिसांनी एक गॅस सिलेंडर व वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठीचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी योगेश मोरे याला ताब्यात घेण्यात आले.सदर प्रकरणी पोलिसांनी अनिलनगर येथील नितीन दिलीप माळवे आणि अंबाबाई पटांगण येथील योगेश बाबू मोरे या दोघांनाही ताब्यात घेऊन कारवाई केली आहे 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !