BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ डिसें, २०२२

उजनी धरणातून नदीत आणि कालव्यात सोडले जाणार पाणी !




 शोध न्यूज : उजनी धरणातून भीमा नदीत आणि कालव्यातून पाणी सोडले जाणार असून भीमा नदीत १० जानेवारीपासून तर कालव्यात १५ जानेवारीपासून पाणी सोडले जाणार आहे. 


उजनी धरण सोलापूरसह अन्य काही जिल्ह्यांना वरदान ठरलेले असून जिल्ह्यातील शेती या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणाचा मोलाचा सहभाग असून सोलापूर जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्राला उजनीच्या पाण्याचा मोठा आधार आहे. रब्बी पिकासाठी आता १५ जानेवारीपासून पाणी सोडले जाणार आहे. उजनीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून सोडण्यात येणारे हे पाणी एक महिना कालव्यातून वाहात राहणार आहे. पहिल्या आवर्तनानंतर मार्च ते एप्रिल या काळात दुसरे आवर्तन देखील सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पिकांच्या गरजेवेळी शेतकरी बांधवाना या पाण्याचा पिकांसाठी मोठा लाभ होणार आहे. पाणी सोडण्याचे नियोजन झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही.


उजनी धरणात सद्या १२०.८३ टीएमसी पाणी उपलब्ध असून यापैकी ५७ टीएमसी पाण्याचा उपयुक्त साठा आहे. भीमा नदीतून १० जानेवारी रोजी धरणातून पाणी सोडले जाणार असून सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे पाणी सोडले जाणार आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाणी संपत आले असून २० जानेवारीपर्यंत हे पाणी पूर्ण संपणार आहे. याबाबत सोलापूर महापालिकेने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला पत्र दिले असून भीमा नदीतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. (Water released from Ujani dam into river and canal) त्यानुसार सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी १० जानेवारीपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !