BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ डिसें, २०२२

एस. टी. पेटली, पळा पळा ... मारा उड्या ! अफवेने उडवला प्रचंड गोंधळ !

 


शोध न्यूज : एस. टी. पेटली, पळा पळा ... मारा उड्या.. प्रवाशांत एकच गोंधळ उडाला परंतु प्रत्यक्षात एस. टी. ला आग लागलीच नव्हती, अफवेनेच प्रचंड घबराट उडवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 


अलीकडे रस्त्यावर धावणारी वाहने अचानक पेटू लागली आहेत आणि ही वाहने जागेवरच जळून खाक देखील होत आहे. सुदैवाने प्रवाशी मात्र यातून बचावले जात आहेत. काही घटनात प्रवाशांचेही मृत्यू झाले आहेत. या घटनात छोटी वाहनेच नव्हे तर मोठ्या बस देखील पेटलेल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाची बस पेटली असल्याची बातमी प्रवाशात पसरली आणि आग न लागताही प्रवाशी मात्र सैरावैरा होण्याची घटना कणकवली येथे घडली आहे. कणकवली आगरातून असरोंडी, असगणी मार्गे मालवणला जाणारी एस.टी. बस सायंकाळी पाचच्या कणकवली बस स्थानकातून निघाली आणि काही वेळेतच हा थरारक प्रकार सुरु झाला. बसला आग लागली अशी माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचली आणि प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. जीव वाचविण्यासाठी कुणी खिडकीतून उद्या मारल्या तर कुणी जमेल तसे बसमधून बाहेर पडू लागले. नागरिकांनीही बसमधील प्रवासी तसेच शाळा, महाविद्यालयातील (college students) विद्यार्थी यांना बस बाहेरकाढले. कणकवली तहसील कार्यालयाच्या समोरच्या बाजूलाच हा थरार सुरु झाला. लोक सैरावैरा पळू लागले. बंदोबस्तासाठी जवळच असलेल्या पोलिसांनी देखील हा प्रकार पाहिला आणि त्यांनी देखील या बसच्या दिशेने धाव घेतली. 


धावत्या बसला आग लागल्याची बातमी परिसरात देखील वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे सगळीकडेच या घटनेने गोंधळ उडवून दिला. नंतर झालेला प्रकार समजला तेंव्हा प्रवाशी मंडळींचा चेहरा केवळ पाहण्यासारखाच झाला होती तर अनेकांना हसावे की रडावे हे समजेनासे झाले. राज्य परिवहन महामंडळाची ही बस कणकवली तहसील कार्यालयाच्या समोरच्या बाजूला आली तेंव्हा बसच्या इंजिनमधून धूर येवू लागला. चालकाने लगेच बस बाजूला घेत थांबवलीही, इंजिनमधून येत असलेला धूर एका प्रवाशाने पहिला आणि त्याने काहींही खातरजमा न करता थेट बस पेटल्याची आरोळी ठोकली ! ही आरोळी ऐकताच बसमधील प्रवाशांनी देखील कसलीही चौकशी न करता अथवा खातरजमा न करता जमेल तेथून बाहेर उड्या मारायला सुरुवात केली. यामुळे तर गोंधळात आणखीच भर पडली. केवळ ऑईलमुळे इंजिनमधून धूर येत होता पण या धुराला आग समजून एका प्रवाशाने सगळ्यांचाच गोंधळ उडवून दिला.

 
अनेकदा काही दुर्घटना होऊनही माणसांचे प्राण वाचतात पण अफवांमुळे सैरावैरा होऊन धावू लागतात. अशावेळीच चेंगरून अथवा अन्य प्रकारे जीविताला धोका होऊ शकतो. परंतु जीवाच्या भीतीने लोक कसलाही विचार अथवा चौकशी न करता जीव वाचविण्यासाठी अशा प्रकारे सैरावैरा होऊन पळत सुटतात, बसमधून उड्या मारू लागतात. (Rumors of the bus catching fire leave the passengers wandering) दुर्घटना न होताही केवळ अफवा देखील जीवावर उठत असतात. असाच काहीसा प्रकार येथे घडला पण सुदैवाने काही अप्रिय घडले नाही. प्रवाशी आणि नागरिकांचा मात्र एका खोट्या आरोळीने प्रचंड गोंधळ उडवून दिला. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !