BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ डिसें, २०२२

पोलिसांनी पकडला लाखो रुपयांचा बेकायदा गुटखा !

 



शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील कुरूळ - मोहोळ मार्गावरून वाहतूक केला जात असलेला साडे नऊ लाखांचा गुटखा मोहोळ पोलिसांनी पकडला असून या प्रकरणी दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


शेजारच्या राज्यातून महाराष्ट्रात येणारा गुटखा, सुगंधी तंबाखू असे महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक आणि उत्पादनास बंदी असलेला पदार्थ नेहमीच येत असतो. मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील पोलिसांनी आत्तापर्यंत अनेकदा असा  बेकायदा गुटखा वाहून नेत असलेली वाहने पकडली असून लाखोंचा गुटका जप्त देखील केला आहे परंतु ही वाहतूक थांबताना दिसत नाही. आता पुन्हा सोलापूर जिल्ह्यात मोहोळ पोलिसांनी तब्बल साडे नऊ लाखांचा गुटका आणि वाहन असा साडे तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस रात्रीची गस्त घालत होते, यावेळी त्यांना कुरूल - मोहोळ रस्त्यावरून एम एच २० एल ई ९१९६ या क्रमांकाचे वाहन महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा घेवून येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. 


मिळालेल्या माहितीच्या आधाराने पोलीस अंदाज घेत असतानाच एक वाहन मोहोळ - पुणे राष्ट्र्रीय महामार्गावरील एका हॉटेलच्या बाजूने पुण्याच्या दिशेने निघाले असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी लगेच या वाहनाचा पाठलाग केला आणि या वाहनाला थांबवले. सदर वाहनात काय आहे याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवाउडवी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या उडवाउडवीमुळे तर पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता त्यांना या वाहनात हिरा नावाचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. (Mohol police caught Gutkha which is banned in Maharashtra)पोलिसांनी या वाहनातील ९ लाख ६० हजार रुपये किमतीचा गुटखा आणि चार लाख रुपये किमतीचे वाहन असा साडे तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर प्रकरणी पोलिसांनी दत्त नगर, औरंगाबाद येथील फईम जलील शेख आणि सय्यद इरफान युसुफ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !